esakal | "मजबूर है तो क्या हुआ १५ मिनिट मे बेड इनका होगा"; नागपूरच्या मजुरासाठी सोनू सूदचा मदतीचा हात

बोलून बातमी शोधा

सोनू सूद
"मजबूर है तो क्या हुआ १५ मिनिट मे बेड इनका होगा"; नागपूरच्या मजुरासाठी सोनू सूदचा मदतीचा हात
sakal_logo
By
अथर्व महांकाळ

नागपूर : कोरोनामुळे गेल्या वर्षीपासून देशभरात नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. कोरोना महामारीमुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे देशाच्या अन्य राज्यातून कामानिमित्त महाराष्ट्रात आलेले मजूर आपापल्या गावी जात आहेत. गेल्या वर्षीही शेकडो मजुर कोरोनाच्या भीतीनं आपल्या राज्यात परत गेले होते. मात्र एक माणूस या सर्व मजुरांसाठी, त्यांच्या प्रकृतीसाठी आणि गरजूंच्या मदतीसाठी धावून येतोय तो म्हणजे अभिनेता सोनू सूद. सोनूनं बेडची गरज असलेल्या एका मजुराला त्वरित बेड मिळवून दिला आहे.

नागपुरातील भाऊराव टेंभूरणे यांची काही दिवसाआधी प्रकृती खालावली होती. परिस्थितीनं गरीब असल्यामुळे त्यांचावर उपचार कसा करणार असा मोठा प्रश्नकुटुंबासमोर निर्माण झाला होता. त्यांच्या मुलानं अनेक प्रयत्न करूनही त्यांना कोणत्याच रुग्णालयात बेड मिळत नव्हता. भाऊराव टेंभूरणे हे तब्बल ६ दिवसांपासून बेडसाठी या रुग्णालयातून त्या रुग्णालयात भटकत होते.

अनेक प्रयत्नांनंतरही बेड न मिळाल्यामुळे अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि ते बेशुद्ध झाले. अशावेळी एका जाणकार नागरिकानं सोनू सूदला ट्विटरवरून या रूग्णाच्या संदर्भातील सर्व माहिती पाठवली आणि बेड उपलब्ध करून देण्याची विनवणी केली.

हेही वाचा: 'तुम्हाला कार हवे की पैसे?' युवकानं दिलं उत्तर आणि घडला भयंकर प्रकार

काही क्षणातच सोनू सूदचा रिप्लाय आला तुमच्या रुग्णाला १५ मिनिटांच्या आतमध्ये बेड मिळेल असं आश्वासन त्यानं दिलं. काही वेळातच त्या मजुराला बेड मिळाला आणि यासाठी धन्यवाद प्रगट करणारं ट्विट आणि फोटो शेअर करत रुग्णानं सून सुदचे आभार मानले. मात्र विशेष म्हणजे त्यांना बेड उपलब्ध करवूं देण्यासाठी अनेक मंत्री, खासदार यांना फोन करण्यात आला असं सोनू सूदला ट्विट करणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं.

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ