Vidarbha : सोयाबीन सूडीला लागली आग : पाच लाखांचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोयाबीन
सोयाबीन सूडीला लागली आग : पाच लाखांचे नुकसान

सोयाबीन सूडीला लागली आग : पाच लाखांचे नुकसान

घाटबोरी, ता. १६ : मेहकर तालुक्यातील जनुना येथील कौशल्याबाई काशिराम जाधव यांच्या शेतातील सात एकरावरील सोयाबीन सुडीला कुणीतरी १५ नोव्हेंबरला रात्री आग लावली. त्यात अंदाजे पाच लाख रुपाच्यांवर नुकसान झाले आहे.

सदर शेतकरी महिलेच्या घरचेच मळणीयंत्र असल्याने सोयाबीन हंगाम चालू असल्याने घरची सोयाबीन सुडी काढायची राहली होती. शेतात त्यांचा मुलगा सुभाष काशिराम जाधव हा घटनेच्या दिवशी सांयकाळी सात वाजता घरी जेवण करण्यासाठी आला होता. त्यामुळे कुणीतरी, त्याच संधीचा फायदा घेत सोयाबीन सुडीला आग लावली. नागरिकांना सोयाबीन सुडीला लागलेल्या आगीचे रौद्ररूप दिल्याने आरडाओरडा पाहून महिलेसह मुलगा शेताकडे धावत गेले. परंतु, तोपर्यत सर्व जळाले होते. सदर घटनेमुळे गावातील नागरिक भयभीत झाले आहेत. आगीत सोयाबीन सुडीवर स्पिंकर पाइपचा सेट, ताडपत्री व मळणीयंत्र आगीत जळाले. सदर घटनेची माहिती तहसीलदार डॉ. संजय गलकर यांनी तातडीने तलाठी आर. डी. धावडे दिली असता यांना पंचनामा करण्याच्या सूचना केल्या. त्यात सात एकरातील सोयाबीन सुडी अंदाजे ७० क्विंटल सोयाबीनसह इतर असे ५ लाख ४६ हजार ५०० रुपयांचे नुकसानीचा पंचनामा करून सदर अहवाल तहसीलदार डॉ. संजय गलकर यांना सादर करण्यात आला आहे. सदर घटनेचा महिला पुत्राने डोणगाव पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करत तपास ठाणेदार नीलेश अपसुंदे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक शिवाजी राठोड, बिट जमादार गणेश राठोड तपास करत आहे.

loading image
go to top