Nagpur : कंपनी संचालकाची सव्वा कोटीने फसवणूक; तीन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा, 5 वर्षांच्या लेखा परीक्षणातून आले उघडकीस

हिंगणा एमआयडीसीतील ‘स्पेसवूड’ कंपनीतील तीन अधिकाऱ्यांनी वर्क ऑर्डरपेक्षा जास्त रक्कम कंत्राटदारांना देत १ कोटी १९ लाखांनी संचालकांची फसवणूक केली.
spacewood company three official fraud of 1 cr crime against three police nagpur
spacewood company three official fraud of 1 cr crime against three police nagpurSakal

नागपूर : हिंगणा एमआयडीसीतील ‘स्पेसवूड’ कंपनीतील तीन अधिकाऱ्यांनी वर्क ऑर्डरपेक्षा जास्त रक्कम कंत्राटदारांना देत १ कोटी १९ लाखांनी संचालकांची फसवणूक केली. एमआयडीसी पोलिस ठाण्यात कंपनीचे संचालक विवेक देशपांडे यांनी तक्रार केली. त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

संस्थात्मक विक्री विभाग प्रमुख विनय निळकंठ घरोटे (शिवाजीनगर), श्रीकांत विनायकराव बोंद्रे (अविघ्न अपार्टमेंट, पावनभूमी) व विक्रांत विनायकराव कापसे (४१, हिवरी लेआउट) अशी आरोपींची नावे आहेत.

बोंद्रेकडे कंपनीच्या कंत्राटदारांची वर्क ऑर्डर बनविणे, बिले जारी करण्याची जबाबदारी होती. विक्रांत हा व्यवस्थापक होता व त्याच्याकडे फर्निचरच्या इन्स्टॉलेशन साइटवर देखरेख करण्याचे काम होते. तर विनय घरोटे संस्थात्मक प्रकल्पांचा एकूणच व्यवसाय पाहात असल्याने खर्च मंजूर करण्यासोबतच एकूण व्यवसायाची पॉवर ऑफ अटर्नी देण्यात आली होती.

२०२२-२३ च्या लेखा परीक्षणात संस्थात्मक प्रकल्पांमध्ये वर्क ऑर्डरपेक्षा जास्त रक्कम आकारल्याची बाब समोर आली. २०१८ पासून ते २०२३ पर्यंतच्या सर्व प्रकल्पांच्या बिलांची तपासणी करण्यात आली. दरम्यान, कंत्राटदारांना फर्निचर इस्टॉलेशनव्यतिरिक्त अतिरिक्त रक्कम आकारल्याची बाब समोर आली.

प्रकाश कदम, मेसर्स लावण्या एंटरप्रायझेस, मेसर्स फर्निचर स्टुडिओ, ओम एंटरप्रायझेस, डिझाईन ॲंड सर्व्हिस सोल्यूशन्स यांच्या बॅंक खात्यातून घरोटे, बोंद्रे, कापसे यांच्यासोबत त्यांच्या पत्नीच्या बॅंक खात्यात १ कोटी १९ लाखांची रक्कम वळती झाल्याची बाब उघडकीस आली. देशपांडे यांच्या तक्रारीवरून तिन्ही आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिचितांच्या खात्यात वळविले पैसे

ही रक्कम लोडिंग, अनलोडिंग, शिफ्टिंग, हॉल्टिंग अशा विविध नावाखाली आकारण्यात आली होती. तिघांनीही वर्क ऑर्डर व्यतिरिक्त अतिरिक्त बिलाचे पैसे कंपनीकडून मंजूर केले व कंत्राटदारांच्या खात्यावरून ती अतिरिक्त रक्कम स्वत:च्या खात्यावर वळती केली. यातून हा घोटाळा समोर आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com