महिला व मुलांसाठी `विशेष पोलिस कक्ष’ विदर्भातील पहिलाच प्रयोग

sitabuldi police station
sitabuldi police statione sakal
Updated on

नागपूर : पोलिस स्टेशन म्हटले की, अनेकांच्या मनात धडकी बसते. महिला, युवती आणि लहान मुलांना तर पोलिस दिसला तरी भीती वाटते. सामान्यांच्या मनातील भीती काढून पोलिस हे आपले संरक्षक असल्याचा विश्‍वास निर्माण करण्यासाठी नागपुरात विशेष कक्षाची (special police room nagpur) निर्मिती करण्यात येणार आहे. या पोलिस ठाण्यात महिला, मुले आणि युवतींबाबत असलेल्या गुन्हे हाताळण्यात येणार आहेत. यात सीताबर्डी पोलिस ठाण्याची (sitabuldi police station nagpur) निवड करण्यात आली असून त्यादृष्टीने लवकरच कार्य सुरू होईल. हा विदर्भातील पहिलाच प्रयोग असणार आहे. (special police room for women and children in nagpur)

sitabuldi police station
आता प्रदूषण होणार कमी, ‘स्‍मार्ट ट्री’ गिळणार हवेतील धुळ!

अनेकदा कौटुंबिक कलहाच्या प्रकरणात महिला लहान मुलांनाही सोबत घेऊन येतात. खाकी वर्दीला बघून महिला व मुले पोलिसांना घाबरतात. ही भीती दूर व्हावी आणि पोलिस हे आपल्यातील एक आहेत. आपल्या मदतीसाठी असलेले शासकीय कर्मचारी आहेत, अशी भावना महिला व मुलांमध्ये निर्माण होण्याची गरज आहे. त्याशिवाय मुलांना लहानपणापासून पोलिस ठाण्यात गेल्याचे वाटू नये म्हणून सीताबर्डी पोलिस ठाण्यात महिला व मुलांसाठी अनुकूल आणि सकारात्मक असे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. यासाठी पोलिस ठाण्याच्या शेजारी एक स्वतंत्र कक्ष निर्माण करून महिला व मुलांची प्रकरणे त्या कक्षातच हाताळण्यात येतील. त्या कक्षातील अधिकारी व कर्मचारी हे साध्या वेशात असतील. तसेच तेथे महिलांसोबत येणाऱ्या मुलांना खेळण्याचीही व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. हा विदर्भातील पहिलाच प्रयोग असून आठवडाभरात सर्व व्यवस्था निर्माण करून उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. महिला व मुले पोलिस ठाण्यात येण्यासाठी घाबरतात. ते मोकळेपणाने बोलत नाही किंवा वावरत नाही. त्यामुळे महिला व मुलांसंदर्भातील प्रकरणे हाताळण्यासाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात येणार असल्याची प्रतिक्रिया पोलिस उपायुक्त विनिता साहू यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com