

Bus Travel Gets Costlier: Nagpur-Amravati Route Sees ₹26 Fare Rise
sakal
नागपूर: उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला आता थोडी कात्री लागणार आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) १५ एप्रिलपासून साध्या बसेसच्या तिकीट दरात १० टक्के तात्पुरती भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागपूर-अमरावती प्रवासासाठी अतिरिक्त २६ रुपये प्रवाशांना मोजावे लागणार आहे. पुढील दोन महिने म्हणजेच १५ जूनपर्यंत ही भाडेवाढ लागू राहणार आहे.