नागपुरातील एसटी कर्मचाऱ्याचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

सुरेश दुधे
सुरेश दुधेसुरेश दुधे

नागपूर : दोन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन संपण्याचे नाव घेत नाही आहे. काही संघटनांनी आंदोलनातून माघार घेतली असली तरी काहींचे आंदोलन सुरूच आहे. अशातच नागपुरातील एसटी कर्मचाऱ्याने विष घेऊन (Take poison) आत्महत्येचा प्रयत्न (Attempted suicide) केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. सुरेश दुधे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, सुरेश दुधे हे नागपूर शहरातील घाटरोड आगारातील कर्मचारी आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे तीन महिन्यांपासून पगार झालेला नाही. काही संघटनांनी आंदोलनातून माघार घेतली आहे, तर काही संघटनांचे अद्यापही आंदोलन सुरू आहे. यामुळे काय करावे आणि काय नाही, अशा मानसिकतेत आंदोलक आहेत.

सुरेश दुधे
१३ वर्षांच्या मुलीचा गर्भपात; महिला डॉक्टरला ठोकल्या बेड्या

अशात तीन महिन्यांपासून पगार न झाल्याने व शेतातील रस्ता दोन बिहारी व्यक्तींनी अडवून ठेवल्याने कर्मचारी पार निराश झाला होता. याची तक्रार केल्यानंतर तहसीलदार, पटवारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सहकार्य न करता पैसे मागितल्याचा आरोप, सुरेश दुधे यांनी केला. कोणताही मार्ग निघत नसल्याने व काय करावे हे सुचत नसल्याने सुरेश यांनी शेतातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

तयार केला व्हिडिओ

सुरेश दुधे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी एक व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओतून त्यांनी होत असलेल्या त्रासाची माहिती दिली. यानंतर त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com