नागपूरचं पाणी मुद्दाम अडविले? सरकारची निविदा काढण्यास दिरंगाई

nagpur
nagpur e sakal

नागपूर : शहराचा पाणी प्रश्न (nagpur water issue) कायमचा सोडविण्यासाठी मागील देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या नेतृत्त्वातील सरकारने दोन वर्षांपूर्वी दोन हजार ८६४ कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. गेल्या दोन वर्षांत या प्रकल्पावर एक हजार कोटी खर्च होणे अपेक्षित होते. परंतु, वर्तमान सरकारने (mahavikas aghadi government) निविदा प्रक्रियाच केली नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे शहराचे पाणी मुद्दाम तर अडविले जात नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (state government delay in issuing tender of water project in nagpur)

nagpur
आता प्रदूषण होणार कमी, ‘स्‍मार्ट ट्री’ गिळणार हवेतील धुळ!

शहराला प्रामुख्याने तोतलाडोह येथील पेंच तसेच कन्हान नदीतून पाणीपुरवठा होतो. दोन वर्षांपूर्वी शहरावर भीषण पाणी संकट आले होते. पेंच जलाशयातील मृत साठा वापरण्याचा प्रसंग आला. परिणामी महापालिकेवर कधी नव्हे ते दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची नामुष्की ओढवली होती. तोतलाडोह येथून पाणीपुरवठ्याच्या मर्यादा दोन वर्षापूर्वी उघड झाल्या होत्या. कन्हान नदीवरही धरण बांधले जात असल्याने शहराला पाणी मिळण्याबाबत चिंता वाढली होती. अशा स्थितीत मध्यप्रदेशातील लोहघोगरी गावाजवळून कन्हान नदीतून बोगद्याद्वारे १० टीएमसी पाणी तोतलाडोह जलायशात वळविण्याचा प्रकल्पाला दोन वर्षापूर्वी मंत्रिमंडळाचीही मंजुरी मिळाली होती. त्यामुळे पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार होता. २०२४ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे प्रस्तावित होते. परंतु राज्यातील सरकार बदलले अन् शहराची कायमची पाणी समस्या सोडविणारा हा प्रकल्पही रखडला. नागपूर शहरच नव्हे तर भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही या प्रकल्पाचा लाभ मिळणार होता. परंतु आताच्या राज्य सरकारने या प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षांत निविदा प्रक्रिया केली नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे भवितव्यच अंधारात दिसून येत असून शहराची पाणीसमस्या भविष्यातही कायम राहण्याची चिन्हे दिसत आहेत.

असा आहे प्रकल्प -

लोहघोगरी गावाजवळ वळण बंधारा बांधून बोगद्याद्वारे कन्हान नदीचे पाणी तोतलाडोह धरणात वळवण्याचे प्रस्तावित आहे. या बंधाऱ्याची लांबी १६० मीटर व उंची ५.५ मीटर प्रस्तावित असून बोगद्याची लांबी ६२ किमी प्रस्तावित करण्यात आली आहे. या बोगद्याचा व्यास ६.९ मीटर असून या प्रकल्पासाठी १२.२६ हेक्टर वनजमिनीची गरज आहे.

असा होणार होता खर्च

  • २०१९-२० - ५८५ कोटी

  • २०२०-२१ - ५७५ कोटी

  • २०२१-२२ - ५७४ कोटी

  • २०२२-२३ - ५७४ कोटी

  • २०२३-२४ - ५५४ कोटी

बोगद्याद्वारे १० टीएमसी पाणी तोतलाडोह जलाशयात वळविण्याच्या प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. नगरविकास विभागाने आदेशही काढले होते. परंतु दोन वर्षांपासून या प्रकल्पाची निविदा प्रक्रियाच रखडली आहे.
- चंद्रशेखर बावनकुळे, माजी पालकमंत्री.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com