esakal | Nagpur: राज्यातील कारागृहे ‘ओव्हर फ्लो’, कर्मचाऱ्यांवरही सुरक्षेचा ताण
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यातील कारागृहे ‘ओव्हर फ्लो’, कर्मचाऱ्यांवरही सुरक्षेचा ताण

राज्यातील कारागृहे ‘ओव्हर फ्लो’, कर्मचाऱ्यांवरही सुरक्षेचा ताण

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर: राज्यातील गुन्हेगारीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे कारागृहात कैद्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कारागृहाच्या क्षमतेच्या तुलनेत कैद्यांची संख्या जवळपास दीडपट ते दुप्पट असल्यामुळे कारागृह प्रशासनाच्या अडचणी वाढत आहे. नागपुरात १,८४० एवढी क्षमता असून सध्याच्या स्थितीत २,४७३ एवढे कैदी बंदिस्त आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांवरही ताण वाढला आहे.

हेही वाचा: मित्रानेच केला मित्राचा खून, औरंगाबादेतील धक्कादायक प्रकार

राज्यातील ६० कारागृहांतील कैद्यांची अधिकृत कैद्यांची संख्या २४ हजार ७०० आहे. प्रत्यक्ष कैदीसंख्या ३२ हजार १२० असल्याचे सुत्राने नमूद केले. यामध्ये सिद्धदोष कैद्यांची संख्या पाच हजार ३१९ व न्यायाधीन कैद्यांची संख्या २४ हजारांवर आहे. तर जवळपास १२० कैदी स्थानबद्ध आहेत. राज्यातील कारागृहे ‘ओव्हर फ्लो’ असून मध्यवर्ती कारागृहे व जिल्हा कारागृहांमध्ये दुपटीपेक्षा अधिक कैदीसंख्या आहे.

कोरोनामुळे वाढली डोकेदुखी

कोरोना काळात कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण होत असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील जवळपास ११ हजार कैद्यांना सेल्‍फ बाँडवर सोडण्यात आले. परंतु, कोरोनामुळे सवलत मिळालेल्या गुन्हेगारांनी कारागृहाबाहेर येताच गुन्हेगारी कारवाया सुरू केल्या. काही कैद्यांनी तर दरोडा, प्राणघातक हल्ला आणि हत्याकांड घडविले. त्यामुळे बाहेर आलेल्या कैद्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली.

loading image
go to top