न डगमगता, सकारात्मक राहून वैद्य कुटुंब झाले कोरोनामुक्त

न डगमगता, सकारात्मक राहून वैद्य कुटुंब झाले कोरोनामुक्त
Updated on

चांपा (जि. नागपूर) : बहादुरा येथील ग्रामसेवक बाळकृष्ण वैद्य यांच्या पत्नी व नंतर दोन्ही मुलांना त्रास व्हायला लागला. चाचणी केली असता पत्नी, दोन्ही मुले कोरोनाबाधित (coronavirus) आढळून आली. अशा कठीण परिस्थितीतही न डगमगता, सकारात्मक राहून या कुटुंबाने घरीच योग्य उपचार घेऊन कोरोनावर मात केली. (Staying positive the Vaidya family became corona free)

बाळकृष्ण वैद्य हे चांपा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक आहेत. वैद्य यांनी दोन्ही लस घेतल्या आहेत. त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. तर कुटुंबातील सर्व सदस्य पॉझिटिव्ह आले. वैद्य यांनी सांगितले की, संकट डोक्यावर असतानासुद्धा आम्ही किंचितही घाबरलो नाही. स्वतःचा आत्मविश्वास ढळू दिला नाही. कुटुंब कोरोनाबाधित असल्याने त्यांच्या देखरेखीपासून ते जेवण व घरची सर्व कामे स्वतः केली. त्यांच्यात विचारांची सकारात्मकता निर्माण व्हावी म्हणून मिळूनमिसळून राहिलो.

न डगमगता, सकारात्मक राहून वैद्य कुटुंब झाले कोरोनामुक्त
कोरोना झाला की सर्व संपले असे नाही; रुग्णालयाचा अट्टाहास सोडा

वेळोवेळी कोरोनाची चाचणी करून घेतली. ती निगेटिव्ह आली. दोन्ही डोस घेतल्याने शंभर टक्के धोका टळलेला आहे. वैद्य कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल न होता घरीच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार केले. रोज योग्य व्यायाम, पोषक आहार, प्राणायाम, सूर्यनमस्कार केले. मुले नेहमीसारखीच खेळत होती. घरच्या छतावरच सायकल चालवीत होती. मनात नकारात्मक विचार येऊ न देता या कुटुंबाने कोरोनाला हरविले.

लसीकरण करून धोका टाळा

पत्नी व मुलांचा एचआरसीटी स्कोअर, ऑक्सिजन पातळी वेळोवेळी तपासून घेत होतो. त्यांच्या जेवणापासून ते तब्येत बरी होईपर्यंत मी त्यांच्या सान्निध्यात होतो. केवळ दोन्ही लसींमुळे माझा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. कोरोनापासून आपले व कुटुंबीयांचे संरक्षण करायचे असेल तर लस घेणे अत्यंत गरजेचे आहे, असे बाळकृष्ण वैद्य यांनी सांगितले.

(Staying positive the Vaidya family became corona free)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nagpur Crime
Nagpur Civic Issue
NMC MBBS Admission
NMRDA Land Acquisition
Marathi News Esakal
www.esakal.com