esakal | अमरावती जिल्ह्यात या सोमवारपासून 'स्टीम' सप्ताह; पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांचे आवाहन

बोलून बातमी शोधा

अमरावती जिल्ह्यात या सोमवारपासून 'स्टीम' सप्ताह; पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांचे आवाहन
अमरावती जिल्ह्यात या सोमवारपासून 'स्टीम' सप्ताह; पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांचे आवाहन
sakal_logo
By
सुधीर भारती

अमरावती ः मास्कचा वापर, हातांची स्वच्छता व सोशल डिस्टन्स या त्रिसूत्री पालनाबरोबरच नागरिकांनी स्वत:च्या आरोग्य संरक्षणासाठी नियमित वाफ, चांगला आहार, कोविड सुसंगत जीवनशैलीचा अवलंब करणे आवश्‍यक आहे. याबाबत भरीव जनजागृतीसाठी जिल्ह्यात माझे आरोग्य- माझी जबाबदारी अभियानांतर्गत सोमवारपासून "स्टीम सप्ताह' राबविण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी स्वत:च्या आरोग्य संरक्षणासाठी "स्टीम सप्ताह' पाळण्याचे आवाहन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

हेही वाचा: क्रीडा संकुलात ९०० खाटांचे जम्बो कोविड सेंटर; ११६ कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार सुलभा खोडके, आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह, पोलिस अधीक्षक डॉ. हरी बालाजी, मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य डॉ. वसंत लुंगे, डॉ. अनिल रोहणकर, हरिभाऊ मोहोड, डॉ. दिनेश ठाकरे, डॉ. संदीप दानखडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: शेवटचं मंगलाष्टक सुरु असताना अचानक झाली 'त्यांची' एंट्री; लग्नमंडपात उडाली तारांबळ; अखेर...

साथीचे संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी कोरोना प्रोटोकॉलबरोबरच स्वच्छता व वाफ घेण्यासारख्या बाबींचे पालन करणे आवश्‍यक आहे, अशी बाब आरोग्यतज्ज्ञांनी या बैठकीत मांडली. त्यानुसार पुढील संपूर्ण सप्ताह स्टीम सप्ताह म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

सध्याच्या परिस्थितीत स्वत:ची काळजी घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने बाहेरून आल्यावर हातांची व शरीराच्या स्वच्छतेसह नियमित वाफ घेतली पाहिजे. सर्व नागरिकांनी हा स्टीम सप्ताह पाळावा व आपल्या आरोग्याप्रती असलेली जबाबदारी पार पाडावी.
- ऍड. यशोमती ठाकूर, पालकमंत्री.

संपादन - अथर्व महांकाळ