esakal | बारावीचा जीवशास्त्र विषयाचा पेपर संपायला अर्धा तास शिल्लक असताना मिळाली धमकी
sakal

बोलून बातमी शोधा

Student attack on teacher for grabbing a copy

उमरेड मार्गावरील नवप्रतिभा केंद्रावर एका विद्यार्थ्यामुळे चांगलीच धावपळ झाली. सकाळी अकरा वाजता पेपरला सुरुवात झाली. दुसऱ्या माळ्यावर असलेल्या वर्गखोलीत सर्व विद्यार्थी पेपर सोडवत होते. पेपर संपायला अर्धा तास शिल्लक असताना एक विद्यार्थी मोबाईल घेऊन कॉपी करीत असल्याचे वर्गावर असलेल्या शिक्षकाला आढळले.

बारावीचा जीवशास्त्र विषयाचा पेपर संपायला अर्धा तास शिल्लक असताना मिळाली धमकी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दहावी व बारावीची परीक्षा महत्त्वपूर्ण असल्याचे म्हटले जाते. बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. मंगळवारपासून दहावीची परीक्षा सुरू झाली. वर्षभर अभ्यास केला की नाही हे परीक्षेच्या निकालानंतर दिसून येते. आपण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावे यासाठी विद्यार्थी अभ्यास करून पेपर सोडवण्यासाठी जातात. मात्र, काही विद्यार्थी शॉर्टकट पर्यायाचा वापर करीत असल्याचे आपणास अनेकदा दिसून येते. ते कॉपी करून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करीत असतात. असाच एक प्रकार सोमवारी (ता. दोन) घडला. 

राज्य शिक्षण मंडळाद्वारे बारावीची परीक्षा सुरू आहे. यासाठी विविध केंद्रांची निवड करण्यात आली आहे. परीक्षा काळात कोणतीही अनुचित घडना घडू नये म्हणून सर्व केंद्रांवर आवश्‍यक ती खबरदारी घेतली जात आहे. मात्र, सोमवारचा दिवस याला अपवाद ठरला. काल बारावीचा जीवशास्त्र विषयाचा पेपर होता. विद्यार्थी विविध केंद्रांवर पेपर सोडवण्यासाठी आले. आपापले बॅग आणि मोबाईल वर्ग खोलीच्या बाहेर ठेऊन परीक्षा हॉलमध्ये पेपर द्यायला गेले. 

सविस्तर वाचा - तुकाराम मुंढे साहेबऽऽ, शिस्तीचाच बडगा उगारणार का? हे करून दाखवा बर...

मात्र, उमरेड मार्गावरील नवप्रतिभा केंद्रावर एका विद्यार्थ्यामुळे चांगलीच धावपळ झाली. सकाळी अकरा वाजता पेपरला सुरुवात झाली. दुसऱ्या माळ्यावर असलेल्या वर्गखोलीत सर्व विद्यार्थी पेपर सोडवत होते. पेपर संपायला अर्धा तास शिल्लक असताना एक विद्यार्थी मोबाईल घेऊन कॉपी करीत असल्याचे वर्गावर असलेल्या शिक्षकाला आढळले. शिक्षकाने विद्यार्थ्याला कॉपी करताना रंगेहाथ पकडले. तसेच त्याचा जवळचा मोबाईल हिसकला. 

विद्यार्थ्याला भीती वाटण्याऐवजी रागात येऊन शिक्षकाला मोबाईल परत देण्याची मागणी केली. मात्र, शिक्षकाने मोबाईल देण्यास नकार दिला आणि कारवाई करण्यात येईल असे म्हटले. यामुळे चिडलेल्या विद्यार्थ्याने चक्‍क शिक्षकाला बुक्‍क्‍या मारायला सुरुवात केली. यामुळे चिडलेल्या शिक्षकाने विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली. या हाणामारीमुळे केंद्रावर एकच गोंधळ झाला होता. याची माहिती केंद्रप्रमुख आणि इतर वर्गातील शिक्षकांना मिळताच त्यांनी वर्ग गाठून दोघांमध्ये हस्तक्षेप करीत प्रकरण शांत केले. 

पोलिसांकडे न जाण्याचा निर्णय

प्रकरण शांत झाल्यानंतर विद्यार्थ्याला खाली नेण्यात येत होते. सर्वांसमोर मारहाण झाल्याने संतापलेल्या शिक्षकाने पुन्हा विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावली. त्यामुळे पुन्हा वाद निर्माण झाला. यानंतर शिक्षकाला विद्यार्थ्याने बघून घेण्याचीही धमकी दिली. त्यामुळे बराच वेळ केंद्रावर गोंधळाचे वातावरण होते. काही शिक्षकांनी त्यास पोलिसांच्या हवाली करण्याची सूचना केली. मात्र, प्रकरण न वाढविता, पोलिसांकडे न जाण्याचा निर्णय घेण्यात आला. 

क्लिक करा - मित्रांसह ती गेली ढाब्यावर, मात्र तिचीच पार्टी तिच्यासाठी ठरली शेवटची

बोर्डाकडूनही तक्रार करण्याचे निर्देश नाही

परीक्षा केंद्रावर घडलेल्या प्रकरणाची माहिती बोर्डाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. मात्र, त्यांना विचारणा केली असता कमालीचे मौन साधले होते. दुसरीकडे केंद्रप्रमुख डफरे यांना संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. मात्र, इतके मोठे प्रकरण घडले असताना बोर्डाकडूनही पोलिसांकडे तक्रार करण्याचे निर्देश मिळाले नाही याबाबत आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणात विभागीय अध्यक्ष रविकांत देशपांडे यांचाही संपर्क होऊ शकला नाही.

loading image