
Female student crushed by a speeding Travels bus in Nagpur; authorities investigate accident.
Sakal
नागपूर: खासगी बसच्या चालकाने भरधाव वाहन चालवून दुचाकीने जाणाऱ्या विद्यार्थिनीला जोरदार धडक दिली. यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना खरबी भागात मंगळवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. भाग्यश्री जियालाल टेंभरे (वय १७, रा. माँ अंबे कॉलनी, खरबी) असे मृत मुलीचे नाव आहे.