
नागपूर : डॉक्टरांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी खासगी डॉक्टरांच्या ‘फैमा’ या संघटनेने आठ दिवसांपूर्वी ‘हेल्पलाइन तयार केली. सरकारी काम अन् सहा महिने थांब या सवयीमुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील एमबीबीएस पदवीधरांपासून तर निवासी डॉक्टरांच्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाने तयार केलेल्या ‘छात्र मानस’ योजनेची वर्षभरानंतरही अंमलबजावणी झाली नसून एक दोन महाविद्यालय सोडले तर उर्वरित ठिकाणी ‘छात्र मानस कक्ष’ तयारच झाले नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.