esakal | प्राध्यापक करायचा लैंगिक शोषण, पीडित विद्यार्थिनीने घेतला हा निर्णय
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur professor molestation

प्राध्यापकांसह विद्यार्थिनीची बाजू ऐकून घेण्यात आली. यामध्ये डॉ. वैरागडे यांच्याविरुद्ध बरेच पुरावे आढळल्याने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र दीक्षित यांनी त्यांचेवर निलंबनाची कारवाई केली. यानंतर विद्यापीठाकडे यासंदर्भातील कारवाईची माहिती आणि निलंबनाचा प्रस्ताव पाठविला. विद्यापीठाद्वारेही या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्‍यता आहे.

प्राध्यापक करायचा लैंगिक शोषण, पीडित विद्यार्थिनीने घेतला हा निर्णय

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नागपूर : नंदनवन येथील वुमेन्स कॉलेजमध्ये वर्गातील मुलीची छेड काढल्याप्रकरणी प्राध्यापक डॉ. दिलीप वैरागडे यांना महाविद्यालय प्रशासनाने निलंबित केले आहे. तसा प्रस्ताव महाविद्यालय प्रशासनाने विद्यापीठाकडे पाठविला आहे. डॉ. वैरागडे यांनी यापूर्वीही असे अनेक प्रकार केले असून यावेळी विद्यार्थीनीने प्राचार्यांकडे लेखी तक्रार केल्याने निलंबनाची कारवाई केली आहे. 

डॉ. दिलीप वैरागडे पंचविस वर्षांपासून वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वीही अनेक प्रकरणात त्यांचे नाव समोर आले आहे. दरम्यान, डिसेंबर महिन्यात डॉ. वैरागडे यांनी संबंधित मुलीला बोलावून घेत, तीची छेड काढण्याचा प्रयत्न केला. यावरून तिने प्राचार्यांकडे तक्रार दिली. प्राचार्यांनी महाविद्यालयात असलेल्या महिला लैंगिक शोषण सेलमार्फत चौकशी करण्यात आली.

अचानक का कमी होतो अभ्यासातला परफॉर्मन्स?


वुमेन्स कॉलेजचा प्राध्यापक निलंबित 
त्यात प्राध्यापकांसह विद्यार्थिनीची बाजू ऐकून घेण्यात आली. यामध्ये डॉ. वैरागडे यांच्याविरुद्ध बरेच पुरावे आढळल्याने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र दीक्षित यांनी त्यांचेवर निलंबनाची कारवाई केली. यानंतर विद्यापीठाकडे यासंदर्भातील कारवाईची माहिती आणि निलंबनाचा प्रस्ताव पाठविला. विद्यापीठाद्वारेही या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, यासंदर्भात प्राचार्यांना विचारणा केली असता, त्यांनी दुजोरा देत, प्रस्ताव विद्यापीठाकडे शुक्रवारीच पाठविला असल्याचे सांगितले. 

निवडणुकीत मी पुन्हा येईन म्हणाल्यामुळे फडणवीस अडचणीत?

विद्यापीठात भूषविली अनेक पदे 
डॉ. दिलीप वैरागडे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात विविध महत्वाची पदे भूषविली आहेत. या प्रामुख्याने वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेच सदस्य आणि इतर विविध प्राधीकरणावर सदस्य म्हणून काम बघीतले आहे. त्यांच्या स्वभावामुळे ते अनेकदा चर्चेत राहतात, हे विशेष.

loading image