esakal | दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना 'इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळेना', परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती
sakal

बोलून बातमी शोधा

student not getting internet connectivity for exam of nagpur university

विद्यापीठाने काढलेल्या दिशानिर्देशानुसार, या परीक्षा संगणक आणि कोणत्याही अ‌ॅन्ड्राईड मोबाईलवर घेण्यात येत आहेत. मात्र, पेपर सोडविण्यासाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटीची गरज असते.

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना 'इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळेना', परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती

sakal_logo
By
मंगेश गोमासे

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांना सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी संकेतस्थळामार्फत (वेबबेस्ड) परीक्षा घेण्यात येत आहेत. मात्र, पेपर सोडविण्यासाठी इंटरनेटची सोय असणे आवश्यक आहे. मात्र, विद्यापीठाच्या क्षेत्रात असलेल्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने या विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. 

हेही वाचा - नागपूर मध्यवर्ती कारागृहात किन्नरावर अत्याचार प्रकरण; अधिकारी, कर्मचारी आणि कैद्यांवर...

विद्यापीठाने काढलेल्या दिशानिर्देशानुसार, या परीक्षा संगणक आणि कोणत्याही अ‌ॅन्ड्राईड मोबाईलवर घेण्यात येत आहेत. मात्र, पेपर सोडविण्यासाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटीची गरज असते. मात्र, विद्यापीठाच्या क्षेत्रात, गोंदिया, भंडारा, वर्धा या जिल्ह्यात बरीच महाविद्यालये दुर्गम भागात आहेत. या भागातील विद्यार्थीही आज परीक्षेसाठी लॉगीन करीत होते. मात्र, या भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याने यातील बरेच विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहीले. याबाबत काही महाविद्यालयांनी परीक्षा विभागाशी संपर्क साधला असून या विषयावर विद्यापीठ तोडगा काढण्यावर विचार करीत आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात इंटरनेटची समस्या आहे. 

हेही वाचा - कोरोनाचा महाब्लास्ट! नागपुरात एकाच दिवशी ४ हजार ९९ नवे कोरोनाग्रस्त; गेल्या वर्षभरातील उच्चांक 

ही समस्या गंभीर आहे. मात्र, ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना आजही 'इंटरनेट कनेक्टिव्हिटी' मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात जाऊन परीक्षा देता येईल. याशिवाय जिथे कनेक्टिव्हिटी आहे तिथून परीक्षा द्यावी. 
-डॉ. प्रफुल्ल साबळे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ. 


 

loading image