Student's suicide : ‘आई-बाबा मला माफ करा, अभ्यासाच्या ताणातून जीवन संपवते’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Galfas

‘आई-बाबा मला माफ करा, अभ्यासाच्या ताणातून जीवन संपवते’

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : ‘आई-बाबा मला माफ करा... मला अभ्यासाच्या ताण सहन होत नाही... मी जीवन संपवत आहे’ अशी भावनिक चिठ्ठी लिहून बारावीच्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास जागनाथ बुधवारी येथे उघडकीस आली. ज्ञानल राजेंद्र टाकळीकर असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपासून ज्ञानल तणावात होती. सोमवारी मध्यरात्री तिने लोखंडी रॉडला ओढणी बांधून गळफास घेतला. नातेवाइकांना सकाळी ती गळफास लावलेल्या अवस्थेत दिसली. नातेवाइकांनी तहसील पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच तहसील पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सचिन सावरकर यांच्यासह पोलिसांना ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून मृतदेह उत्तरीयतपासणीसाठी मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला.

हेही वाचा: ...अन् मध्यरात्री आईला मुलगी प्रियकरासोबत दिसली नको त्या अवस्थेत

पोलिसांनी ज्ञानलने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त केली. ‘अभ्यासाच्या तणावातून मी आत्महत्या करीत आहे. माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही’, असे तिने चिठ्ठीत लिहिले आहे. याप्रकरणी तहसील पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. ज्ञानलचे वडील खासगी काम करतात. ज्ञानलच्या आत्महत्येमुळे पालक वर्गांत खळबळ उडाली आहे.

loading image
go to top