Nagpur News: नागपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील ५ कोटींपेक्षा अधिकच्या निविदा कोणतीही मंजुरी न घेता रद्द. जिल्हा परिषदेतील पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण.
नागपूर : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील गोंधळ थांबता थांबत नसून प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्ती व साहित्य पुरवठ्यासाठी काढलेल्या पाच कोटींपेक्षा अधिकच्या निविदा अचानक रद्द करण्यात आल्याची चर्चा आहे.