National Girl Child Day : राष्ट्रीय बालिका दिवसाच्या निमित्ताने सुकन्या समृद्धी योजनेला पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या दहा महिन्यांत ५८ हजार सुकन्यांच्या उज्वल भविष्याकरिता त्यांच्या पालकांनी या योजनेत गुंतवणूक केली आहे.
नागपूर : मुलींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, त्यांना शिक्षण व समान संधी उपलब्ध व्हावी याकरिता दरवर्षी २४ जानेवारीला राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो, या दिनाचे औचित्य साधून अनेक पालक आपल्या लाडक्या चिमुकलीच्या उज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करतात.