Nagpur Mercury Decrease : ढगांनी रोखला नागपूरचा पारा; तापमान ४१.८ अंशांवर

ढगाळ वातावरणाने नागपूरकरांना मिळाला दिलासा.
Nagpur Summer
Nagpur Summersakal

नागपूर - गेल्या आठ दिवसांपासून नागपूरकरांची डोकेदुखी ठरलेल्या नवतपाच्या तीव्र प्रभावाला शेवटच्या दिवशी ढगाळ वातावरणाने रोखून धरले. शहरात दिवसभर ढगांची दाटी राहिल्यामुळे बहुतांश जिल्ह्यातील कमाल तापमानात मोठी घट झाली. त्यामुळे तब्बल आठवड्याभरानंतर नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र जाता जाता नवतपाने शहरात पुन्हा सात बळी घेतले.

प्रादेशिक हवामान विभागाने रविवारपासून तीन-चार दिवस नागपूरसह काही जिल्ह्यांमध्ये मॉन्सूनपूर्व पावसाचा यलो अलर्ट दिला होता. उपराजधानीत पाऊस तर आला नाही, मात्र दिवसभर ढगाळ वातावरण होते. अपेक्षेप्रमाणे वातावरण बदलल्याने तापमानातही एक ते पाच अंशांची घट झाली. शनिवारी ४५.२ अंशांवर गेलेला नागपूरचा पारा आज साडेतीन अंशांनी घसरून ४२.८ अंशांवर आला.

भंडारा (३९.५), बुलडाणा (३८.२), गडचिरोली (४०.६), गोंदिया (४०.६), वर्धा (४१.५) येथेही चटके कमी जाणवले. विदर्भात केवळ यवतमाळ येथेच सर्वाधिक ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. मॉन्सूनपूर्व पावसासाठी सध्या अनुकूल वातावरण असल्यामुळे विदर्भात पुढील काही दिवस पाऊस व ढगाळ वातावरण राहणार आहे. ढगाळ वातावरणाचे सत्र मॉन्सूनच्या आगमनापर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे.

उष्माघातामुळे ७ जणांचा बळी

दरम्यान, उष्माघातामुळे रविवारी पुन्हा उपराजधानीत सात जणांचा बळी घेतला. यातील दोन मृत्यू धंतोली व इमामवाडा परिसरात, तर प्रतापनगर, तहसील व नवीन कामठी भागांत प्रत्येकी एक जण दगावला. धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साईमंदिर गेटसमोर ४० ते ४५ वर्षीय व गोवारी उड्डाणपूलाखाली (बिगबाजारसमोर) ५५ ते ६० वर्षीय व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळली.

तर इमामवाडा परिसरातील रामबाग एनआयटी मैदानाजवळ ४५ ते ५० वर्षीय तसेच बैद्यानाथ चौकात ३५ वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू झाला. याशिवाय प्रतापनगर भागातील मंगलमूर्ती चौकात ६० वर्षीय, तहसील पोलिसांच्या हद्दीतील मेयो रुग्णालयातजवळ ४५ वर्षीय आणि नवीन कामठी भागातील बस स्टॅण्ड चौकात ५५ ते ६० वर्षीय व्यक्ती दगावली. हे सर्व मृत्यू उष्माघातामुळे झाले असावे, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com