Temperature : उन्हाने वाढवला नागपूरकरांचा ताप; पारा ४२.६ अंशांवर

जागतिक तापमानावर नजर टाकल्यास सोमवारी ओमानमधील जोबा येथे तब्बल ५३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
Summer Increase in nagpur
Summer Increase in nagpursakal

नागपूर - रविवारी मोसमातील सर्वात उष्ण दिवस अनुभवणाऱ्या नागपूरकरांना आजही उन्हाचे तीव्र चटके सोसावे लागले. रविवारच्या तुलनेत सोमवारी कमाल तापमानात किंचित घसरण झाली असली तरी, उकाड्याने हैराण केले. विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रम्हपुरीत झाली. मंगळवारपासून अवकाळी पावसाची शक्यता असल्याने पारा घसरून वैदर्भींना दिलासा मिळू शकतो.

आठ दिवसांपासून उन्हाची तीव्र लाट सुरू आहे. वाढत्या उष्णतेने अवघ्या विदर्भालाच कवेत घेतले आहे. सोमवारी विदर्भातील अकरापैकी तब्बल दहा जिल्ह्यांचे तापमान ४० अंशांच्या वर होते. सूर्यनारायणाचा सर्वाधिक प्रकोप ब्रम्हपुरी येथे झाला. येथील ४४.१ अंश सेल्सिअस तापमान राज्यात सर्वाधिक ठरले. सोलापूर येथेही इतक्याच तापमानाची नोंद झाली.

विदर्भात दहा जिल्हे ४१ अंशांच्यावर

नागपूरच्या तापमानात किंचित घसरण होऊन पारा ४२.६ अंशांवर आला. याशिवाय चंद्रपूर (४३.६ अंश सेल्सिअस), वर्धा ४३.५ अंश सेल्सिअस), वाशीम ४३.४ अंश सेल्सिअस) आणि अमरावती (४३.२ अंश सेल्सिअस) येथेही उन्हाचे चटके बसले. रविवारच्या तुलनेत विदर्भातील तापमानात थोडीफार घसरण झाली. मात्र उकाडा कायम होता. उन्हाच्या तीव्र झळा दिवसाच नव्हे, सूर्यास्तानंतरही कायम होत्या. यामुळे कुलर व पंखे प्रभावीहिन ठरत आहेत.

आजपासून वादळी पाऊस?

विदर्भात उद्या, मंगळवारपासून मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा (यलो अलर्ट) आहे. त्यामुळे तापमानात घसरण होऊन वैदर्भींना दिलासा मिळू शकतो. यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, अमरावती व वर्धा या पाच जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. ‘सायक्लॉनिक सर्क्युलेशन’मुळे पुढील तीन-चार दिवस विदर्भात पावसाळी वातावरण राहणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

बापरे, ओमानमध्ये ५३.४ डिग्री

जागतिक तापमानावर नजर टाकल्यास सोमवारी ओमानमधील जोबा येथे तब्बल ५३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. येथे जगात सर्वाधिक तापमान नोंदले गेले. तर बर्फाळ प्रदेश असलेल्या अंटार्क्टिकामधील काँकर्डिया येथे उणे ७४.४ डिग्री तापमानाची नोंद झाली. जागतिक तापमानाची नोंद करणाऱ्या ‘एल डोराडो’ या संकेतस्थळावरील नोंदीनुसार, जगातील पहिल्या १५ शहरांमध्ये भारतातील तीन शहरांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com