esakal | ZP Election 2021 : नागपुरात सुनील केदारांचा वरचष्मा, भाजपला तगडी टक्कर
sakal

बोलून बातमी शोधा

congress minister sunil kedar

ZP Election 2021 : नागपुरात सुनील केदारांचा वरचष्मा, भाजपला तगडी टक्कर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : नागपुरात जिल्हा परिषदेच्या (nagpur zp election 2021) १६ जागांसाठी निवडणूक होत आहे. आतापर्यंत १० जागांचे कल हाती आले असून यापैकी ७ जागांवर काँग्रेसने ताबा मिळविला आहे, तर फक्त एक जागा भाजपला मिळविता आली. तसेच अन्य पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत. स्वतः काँग्रेसचे पशूसंवर्धन मंत्री सुनिल केदार (minister sunil kedar) यांनी नागपूरमध्ये लक्ष घातले होते. त्यांच्या प्रयत्नला यश आल्याचे दिसून येत आहे. त्यांनी स्वतःचा वरचष्मा राखत असून भाजपला धक्का दिला.

हेही वाचा: नागपुरात भाजपला मोठा धक्का, बावनकुळेंचे कट्टर समर्थक पराभूत

हेही वाचा: Live : डहाणूमध्ये शिवसेना खासदाराच्या मुलाचा पराभव

अनिल निदान हे चंद्रशेखर बावनकुळे यांचे कट्टर समर्थक आणि जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आहेत. ते गुमथळा गटातून निवडणूक लढवित होते. ते भाजप समर्थित उमेदवार होते. मात्र, काँग्रेसच्या दिनेश ढोले यांनी दणदणीत विजय मिळवून निदान यांचा पराभव केला आहे. तसेच आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार नागपूर जिल्हा परिषदेमध्ये ४ जागांवर काँग्रेसने विजय मिळविला असून फक्त एका जागेवर भाजपला विजय मिळविता आला आहे. तसेच शेकाप आणि गोंगाप या पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाल्या आहेत. मात्र, त्यांची काँग्रेससोबत आघाडी आहे. त्यामुळे सुनिल केदारांची मेहनत फळाला आली असं म्हणता येईल.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप आघाडीला १० मधून ९ जागांवर काँग्रेस निवडून आले आहे. काँग्रेसची एकहाती सत्ता येणार आहे. भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात जनतेला धोका दिला आहे. त्यामुळे त्यांना जनतेने जागा दाखवून दिला आहे. आधी जिल्हा परिषदेत आमचे ३१ सद्स्य होते. आता ३४ सदस्य होणार आहेत, असा विश्वास काँग्रेस नेते राजेंद्र मुळक यांनी व्यक्त केला.

नागपूर जिल्हा परिषद निकाल -

हिंगणा (डिगडोह ): संजय जगताप (काँग्रेस)

मौदा (अरोली) : योगेश देशमुख (काँग्रेस)

काटोल (येणवा): समीर उमप (शेकाप)

कामठी(गुमथळा): दिनेश ढोले (काँग्रेस)

नागपूर (गोधनी): कुंदा राऊत  (काँग्रेस)

रामटेक (बोथीया पालोरा): हरीश उईके (गोंगापा )

कामठी (वडोदा): अवंतिका लेकुरवाळे (काँग्रेस)  

काटोल (पारडसिंगा): मीनाक्षी संदीप सरोदे (भाजपा)

पारशिवनी (करभाड ): अर्चना भोयर (काँग्रेस)

loading image
go to top