Supreme Court: गंभीर दुखापतीच्या उद्देशाने केलेली कृती क्रूरता; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
Domestic Violence: सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवत गंभीर दुखापत करण्याची कृती किंवा आत्महत्येस प्रवृत्त करणारी कृती ही ‘क्रूरता’ ठरते, असे स्पष्ट केले. नागपूरातील हुंडाबळी प्रकरणात सासरच्यांना दिलासा मिळाला असला तरी पतीविरुद्धचा गुन्हा कायम ठेवण्यात आला आहे.
नागपूर : एखाद्या व्यक्तीला गंभीर दुखापत करण्याच्या उद्देशाने केलेली कृती किंवा त्या व्यक्तीला आत्महत्येस भाग पाडणारी कृती म्हणजे क्रूरता असल्याचे महत्त्वपूर्ण निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात नोंदविले आहे.