Vasanta Dupare Death Penalty Caseesakal
नागपूर
Supreme Court: वसंता दुपारेच्या फाशीच्या शिक्षेवर पुन्हा सुनावणी; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, निकालातील निरीक्षण नोंदविले चुकीचे
Nagpur Crime : सर्वोच्च न्यायालयाने वसंत दुपारेच्या फाशीच्या शिक्षेवर ऐतिहासिक निर्णय देत निकाल कायम ठेवला. मात्र २०१७ मधील निरीक्षण चुकीचे असल्याचे नमूद करून प्रकरणाच्या नव्या सुनावणीसाठी सरन्यायाधीशांकडे वर्ग केले.
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत क्रूरकर्मा वसंत संपत दुपारेच्या फाशीवर निकाल कायम ठेवत यावर पुन्हा सुनावणीचा निर्णय घेतला. सर्वोच्च न्यायालयाने २०१७ मध्ये शिक्षेच्या संदर्भात नोंदविलेले निरीक्षण रद्द केले आणि पुढील सुनावणीसाठी हे प्रकरण सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यासमक्ष निश्चित केले.

