esakal | विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर काय? पर्यवेक्षकीय यंत्रणा करणार तपासणी
sakal

बोलून बातमी शोधा

student

विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर काय? पर्यवेक्षकीय यंत्रणा करणार तपासणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राज्याच्या शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेद्वारे ‘ब्रीज कोर्स' (bridge course) राबविण्यात येत आहे. त्यामध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर काय? (study level of student) याची पडताळणी करण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. मात्र, कोरोनामुळे या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचे कसे? असा प्रश्‍न अधिकारी आणि पर्यवेक्षकीय यंत्रणेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तपासणीमध्ये दुसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. (survey will conduct to check the level of study)

हेही वाचा: निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या सदस्यास मारहाण

राज्याच्या शैक्षणिक संशोधन आणि परीक्षा परिषदेद्वारे कोरोनामुळे शैक्षणिक नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘ब्रीज कोर्स' तयार करण्यात आला आहे. पंचेचाळीस दिवस हा अभ्यासक्रम राबवायचा आहे. मात्र, हे करत असताना, त्या विद्यार्थ्यांकडे सोयी-सुविधा आहेत किंवा नाही, त्याची कितपत आकलन शक्ती आहे, त्याने गेल्यावर्षी काय शिकले याबाबत शिक्षण विभागाला माहिती द्यायची आहे. त्यासाठी विभागाने प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एका वर्गातील चार असे सात वर्गाच्या २८ विद्यार्थ्याची माहिती संकलित करायची आहे. ही माहिती चार दिवसात संकलित करावयाची आहे. त्यात प्रामुख्याने सर्वच तालुक्यातील मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, हे करीत असताना, गेल्या वर्षभरात बरेच विद्यार्थी शिक्षकांच्या संपर्कात नाहीत. अनेकांनी मोबाईलची सुविधा नसल्याने शाळाही सोडल्या आहेत. त्यामुळे १०० टक्के विद्यार्थ्यांना संपर्क कसा करायचा हा प्रश्‍न आहे. विशेष म्हणजे, ही माहिती संकलित करून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडे द्यायची आहे.

दुसरीकडे ‘ब्रीज कोर्स' पंचेचाळीस दिवस राबवायचा असताना, तो ऑनलाइन की ऑफलाइन याबाबत बराच संभ्रम आहे. प्रामुख्याने मराठी म्हटल्यावर इतर भाषेतील विद्यार्थी वाऱ्यावर सोडावे काय? असा प्रश्‍न निर्माण होत आहे. त्यामुळे शिक्षकही संभ्रमात आहेत.

loading image