Viral Video: आधी लगीन लोकशाहीचं... विवाहाच्या अवघे काही तास आधी तरुण पोहचला मतदान केंद्रावर

Bride-Groom Voting: आज लोकसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. यासाठी सर्वजन मोठ्या प्रमाणात सहभाग घेत आहेत. अशात, अनेक नवदाम्पत्यांनी विवाहाच्या वेशभूषेत मतदान केंद्रांवर हजेरी लावली आहे.
Bride-Groom Voting|Loksabha Election 2024
Bride-Groom Voting|Loksabha Election 2024Esakal

देशातील लोकसभा निवडणुकांसाठी आज पहिल्या टप्प्यांतील जागांवर मतदान होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पाच जागांवर मतदान होत आहे.

या पाच जागांमध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या मतदारसंघांचा समावेश आहे.

यामध्ये केंद्रिय मंत्री नितिन गडकरी, राज्यातील कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार, गेल्या निवडणुकीत महाराष्ट्रातून एकमेव विजयी उमेदवार बाळू धानोकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर या आपले न

दरम्यान, नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदार संघातील बेला गावात स्वप्निल डांगरे या तरुणाने विवाहाला अवघे काही तास शिल्लक आपला मतदानाचा हक्क बजावला.

विशेष म्हणजे, स्वप्निलचा आज विवाह असून, नवरदेवाच्या वेशातच त्याने बेला मधील बेसिक शाळा या मतदान केंद्रावर येत मतदान केले. यावेळी स्वप्निलबरोबर त्याचे नातेवाईकही उपस्थित होते. मतदानानंतर तो विवाह स्थळी रवाना झाला.

राजस्थानातही नवदाम्पत्याने केले मतदान

आज मतदान होत असलेल्या पहिल्या टप्प्यांतील जागांमध्ये राजस्थानमधील काही जागांचाही समावेश आहे. आज मतदानाला सुरुवात झाली तेव्हा नागौर लोकसभा मतदारसंघातील डिडवाना मतदान केंद्रावर एका नवदाम्पत्याने विवाहाच्या वेशभूषेत एकत्रित मकतदान केले.

यावेळी संपूर्ण मतदार केंद्रावर लोकांकडून त्यांचे कौतुक होत होते. तसेच अनेकजन या जोडप्याकडे औत्सुकाने पाहत होते.

नैनिताल जिल्ह्यातील लाल कुआन मतदारसंघातील दैलिया मतदान केंद्रावर नवदाम्पत्याने मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवात सहभाग घेतला.
नैनिताल जिल्ह्यातील लाल कुआन मतदारसंघातील दैलिया मतदान केंद्रावर नवदाम्पत्याने मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवात सहभाग घेतला. Esakal

मतदानाने घेतला माहेरचा निरोप

उत्तराखंडमध्येही पाच जागांसाठी आज मतदान होत आहे. दरम्यान नैनिताल जिल्ह्यातील लाल कुआन मतदारसंघातील दैलिया मतदान केंद्रावर नवदाम्पत्याने मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवात सहभाग घेतला.

या जोडप्याचे रात्री उशिरा लग्न झाल्याचे नववधूने सांगितलं आणि आज मतदानाच्या दिवशी माहेरचा निरोप घेत आहे, मात्र निरोप घेण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याचे काम केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com