दारूप्रमाणेच पेट्रोल-डिझेलवरील करातही ५० टक्के कपात करा - चंद्रशेखर बावनकुळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tax on petrol and diesel should reduced by 50 percent like alcohol - Chandrasekhar Bavankule nagpur
दारूप्रमाणेच पेट्रोल-डिझेलवरील करातही ५० टक्के कपात करा - चंद्रशेखर बावनकुळे

दारूप्रमाणेच पेट्रोल-डिझेलवरील करातही ५० टक्के कपात करा - चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर : विदेशी मद्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरच्या व्हॅटमध्ये पन्नास टक्के कपात करावी असे सांगून माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जनतेला दिलासा देण्याची मागणी केली.केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेलवरील अबकारी मुल्यात कपात केली आहे. त्यामुळे आपसूकच व्हॅटमध्ये २६ टक्क्यांनी कपात झाली आहे. मात्र आपण दीड ते दोन रुपयांनी इंधनाचे दर घटविल्याचा दावा महाविकास आघाडी सरकारमार्फत केला जात आहे. केंद्र सरकारने गेल्या सहा महिन्यांत दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलवरील अबकारी करात कपात करून जनतेला मोठा दिलासा दिला आहे.

महाराष्ट्रात पेट्रोलवर लिटरमागे ३२.५५ रुपये तर डिझेलवर लिटरमागे २२.३७ रुपये एवढा कर आकाराला जातो. तो कमी केला जात नाही, उलट याचे राजकारण करून वाद घातला जात आहे. एकीकडे महागाईच्या नावाने सत्ताधाऱ्यांनीच निदर्शने करायची आणि दुसरीकरे कर कपात न करता जनतेची लूट सुरूच ठेवायची असा दुटप्पी डाव महाविकास आघाडी खेळत असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.ठाकरे सरकारने कर कपातीचा केवळ कागदावरच गाजावाजा केला असून ही कर कपात प्रत्यक्षात आणून जनतेला दिलासा देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यासंबंधिचा अधिकृत आदेश जारी करण्यातही सरकार टाळाटाळ केली जात आहे, याकडेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्ष वेधले.

Web Title: Tax On Petrol And Diesel Should Reduced By 50 Percent Like Alcohol Chandrasekhar Bavankule Nagpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top