परिस्थितीवर मात करणाऱ्या शिक्षकाला कोरोनाने मात्र हरविले; सात गुणांनी यूपीएससी हुकली

teacher died by corona virus in mouda to Nagpur
teacher died by corona virus in mouda to Nagpur

काटोल (जि. नागपूर) : भल्याभल्यांना साध्य होत नसलेली देशातील सर्वोच्च परीक्षा यूपीएससी होय. ही परीक्षा पास करायची या बेताने अभ्यास करताना घरची हलाखीची परिस्थिती आड येऊ दिली नाही. परीक्षा तितक्याच दिमाखात पास करून दाखविली. मात्र, मुलाखतीत सात गुणांनी प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न भंग पावले. परत तितक्याच जोमाने परीक्षा द्यावी तर म्हातारे आई-वडील, भावाच्या जबाबदारीने कुटुंबाचा गाडा हाती घ्यावा लागला. त्याने आपल्या बळावर बऱ्यापैकी जम बसविला होता. मात्र, कोराना लाटेने त्याचे नुकते कंबरडेच मोडले नाही. तर परिस्थितीसमोर हार न मानणाऱ्या मसलीच्या मनीषला कोरोनासमोर मात्र जीव गमवावा लागला.

काटोल तालुक्यातील मसली रहिवासी तथा कोंढाळी येथील शिक्षक मनीष उर्फ सोनू बाबाराव क्षीरसागर (वय २२) यांचे नागपूर येथे उपचारादरम्यान कोरोना आजाराने निधन झाले. अत्यंत हुशार यूपीएससीची परीक्षा पास झालेला. पण, मुलाखतीमध्ये सात गुणाने नोकरीला मुकावे लागले होते. यानंतर हिंमत न हारता कळमेश्‍वर येथे कॅफे सेंटर सुरू केले. सोबत कोंढाळी येथे शिक्षक म्हणून कार्य करीत होता.

आर्थिकदृष्ट्या स्थिरावल्यावर दोन वर्षांपूवी विवाहाचा निर्णय घेतला. त्यांच्या सुखी संसारात एका गोंडस मुलीचे आगमन आठ महिन्यांपूर्वी झाले होते. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून कॉन्व्हेंट बंद आहे. तसेच लॉकडॉउनमुळे कधी सुरू तर कधी बंद राहणाऱ्या कॅफे सेंटरवर घर खर्च चालवू न शकल्याने आर्थिक अडचणीतून त्यांनी आपले शिक्षण व गुणवत्तेचा विचार न करता भाजीपाला विकायला सुरुवात केली होती.

काही दिवसांपूवी आजारी पडल्याने अगोदर गावी उपचार घेतले. कोरोनाची तपासणी केली असता पॉझिटिव्ह आली. प्रकृती अधिकच गंभीर होत चालली होती. म्हणून उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. भाजीपाला विकताना त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असावा, असा अंदाज आहे. अत्यंत हुशार, कर्तबगार शिक्षकाची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.

त्यांच्या अशा अवेळी गेल्याने वृद्ध आई-वडील, भाऊ, पत्नी यांचा आधार गेला. तर आठ महिन्यांची चिमुकली वडिलांच्या प्रेमाला पोरकी झाली. मसली येथे त्यांच्या निधनाची वार्ता समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. निधनानंतर त्यांच्या आप्तस्वकियांना नागपूरला बोलावून ओळख पटवून शासन स्तरावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com