कलेचे धडे देणाऱ्यांचा हरवला ‘सूर’; ऑनलाइन वर्गाला प्रतिसाद नाही

कलेचे धडे देणाऱ्यांचा हरवला ‘सूर’; ऑनलाइन वर्गाला प्रतिसाद नाही
Updated on

नागपूर : कोरोनाचा (coronavirus) परिणाम जसा प्रत्येक क्षेत्रावर झाला, तसा कलेचे धडे देणाऱ्या संस्थांवरही झाला आहे. वर्षभरापासून असलेल्या निर्बंधामुळे आपल्याकडील ज्ञान, कौशल्य इतरांना वाटत कला क्षेत्रात नवी पिढी निर्माण करणारे कला शिक्षकही संकटात (Teacher in crisis) सापडले आहेत. इतर वेळी समाजाकडून कलावंताला मान-सन्मान मिळत असताना याच समाजापुढे मदतीचा हात पसरविणे या कलावंतांना अवघड जात आहे. (Teachers who teach art are in trouble)

गायन, वादन, नृत्य, नाट्य विषयांवरील धडे देणाऱ्या संस्था शहरातील प्रत्येक भागामध्ये पाहायला मिळतात. कलेचे धडे देण्यासोबतच कला क्षेत्रात नवी पिढी घडविण्यासाठी या संस्थांचे मोठे योगदान असते. शालेय जीवनासह फावल्या वेळेत मुलांवर कलेचे संस्कार व्हावे म्हणून पालक त्यांना अशा संस्थांमध्ये दाखल करतात. त्या बदल्यात मिळणाऱ्या शुल्कातून या शिक्षकांचा उदरनिर्वाह चालतो.

कलेचे धडे देणाऱ्यांचा हरवला ‘सूर’; ऑनलाइन वर्गाला प्रतिसाद नाही
चंद्रपुरात म्युकोर मॉयकॉसिसचे २६ रुग्ण, कोरोनातून बरे झालेल्यांना तपासणी करण्याचे आवाहन

सांस्कृतिक कार्यक्रमांच्या होणाऱ्या आयोजनामध्ये आपली कला सादर करीत आपल्या संसाराचा गाडा ही मंडळी ओढतात. मात्र, कोरोनाचे निर्बंध लादल्यापासून सर्व या शिक्षकांच्या आर्थिक अडचणींमध्ये वाढ झाली आहे. ऑनलाइन पर्याय उपलब्ध असूनही पालक मुलांना वर्गामध्ये बसवायच्या मानसिकतेमध्ये नाहीत. यामुळे शिक्षकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. तर सांस्कृतिक कार्यक्रमांचेदेखील आयोजन होत नसल्याने यातून मिळणारे उत्पन्नदेखील बंद झाले आहे.

कलेचे धडे घेताना प्रत्यक्ष वर्गामध्ये उपस्थित राहून शिकण्याची मजा वेगळी असते. मुले इतरांचे अनुकरण करीत एकाग्रतेने शिक्षण घेतात. हे वातावरण ऑनलाइन वर्गात तयार होत नाही. यामुळे विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली. याचा मोठा परिणाम शिक्षकांच्या उत्पन्नावर झाला आहे. शासनाने कला क्षेत्रात धडे देणाऱ्यांचा विचार करीत एखाद्या योजनेमध्ये समावेश करून घ्यायला हवा.
- अंजली निसाळ, संचालक, आलाप संगीत विद्यालय
कलेचे धडे देणाऱ्यांचा हरवला ‘सूर’; ऑनलाइन वर्गाला प्रतिसाद नाही
उपचारासाठी ४०० किमीचा प्रवास अन् दोन हजारांत दोन तास ऑक्सिजन; वाचा मृत्यूचा प्रवास

ऑनलाइन शिक्षण मिळावे

मुलांना कलेमधून एक वेगळा आनंद मिळतो. शाळा बंद असून मुलांना खेळण्यासाठी मैदानामध्ये पाठविणे पालकांसाठी अवघड बाब आहे. घरबसल्यामुळे मुले मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या आहारी जात आहेत. या ऐवजी कला क्षेत्रातील कुठल्याही विषयाचे ऑनलाइन शिक्षण मुलांना मिळाल्यास वेळेचा सदुपयोग होईल आणि मुलांच्या कौशल्यातही भर पडेल.

(Teachers who teach art are in trouble)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com