बाळाची नाळ घरीच कापणारी बहिष्कृतांची टोली!

पोटाची खळगी भरण्याची सोय नाही. गरीबी यांच्या पाचवीलाच पुजलेली. कचरा वेचला तरच घरातील चूल पेटते, असे जगण्याचे भयावह चित्र.
Baby
BabySakal

नागपूर - पोटाची खळगी भरण्याची सोय नाही. गरीबी यांच्या पाचवीलाच पुजलेली. कचरा वेचला तरच घरातील चूल पेटते, असे जगण्याचे भयावह चित्र. त्यात पोटात वाढणाऱ्या अंकुराला घेऊनच पोटासाठी कचरा वेचण्याची तिची धावाधाव. गर्भारपणाचे दिवस कवा भरले हेच तिच्या लक्षात येत नाही. पोटात दुखू लागलं की, ती नवऱ्याला सांगते. जवळ पैसा अदला नाही, म्हणून काळोख्या रात्री घरीच बाळाची गर्भाशी जुळलेली नाळ सासूने कापली…कन्या जन्माला आली. दारिद्र्यात खितपत पडलेल्या अशा शेकडो माता आहेत की ज्यांची आजही घरीच प्रसूती होते. आरोग्यसेवा अजूनही त्यांच्यापासून कोसो दूर आहे.

आशा पात्रे आणि सुमित्रा रोकडे या दोघी घरीच बाळंत झाल्या. सुमित्रा पाच लेकरांची माय. सारी लेकरं झोपडीतच जन्माले आली...नुकताच जन्माले आलेला रॉकी, नाव ठेवले, मात्र जन्माच्या दाखला विचारला त्यावेळी इंडियातील फाटक्या लक्तरातील मदर म्हणाली, ‘काहाची नोंद’! येथे जन्माला आलेल्या ८० टक्के मुलांच्या ना जन्माची नोंदच नाही. बहिष्कृतांची टोली आजही हे विदारक वास्तव घेऊन स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीत जगत आहे.

Baby
विधान परिषदेतील विजयानंतर फडणवीसांना भेटताना बावनकुळे भावूक

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची मुहूर्तमेढ रोवताना जे लढले, त्यांचे वारसदार भटकंती करीत आले अन येथे विसावले, त्यांची ही वस्ती. १९३९ सालापासूनचा इतिहास टोली वस्तीशी जुळला. सारे मांग-गारुडी. पूर्वी अवैध दारू काढणे हाच त्यांचा व्यवसाय होता. आता दारु काढण्याचा व्यवसाय सोडला. आरोग्य, शिक्षण पुरवणाऱ्या यंत्रणांनी टोली माणसांकडे त्यांच्या गरजांकडे लक्षच दिले नाही. जीवन-मरणाच्या तसेच विकासाच्या समस्या घेऊन ही वस्ती केवळ जगते आहे विकासाच्या प्रतीक्षेत. पहाटे सूर्य उगवण्यापर्वी भुकेल्या पोटाची भूक भागवण्यासाठी ही वस्ती जागी होते. दवडीत रात्रीची शिळीपाकी उरली ती पोटात ढकलत पाठीवर रिकामं पोतं टाकून कचऱ्याच्या शोधात येथील प्रत्येक घरातील माय निघते. दिवसभर कचरा उचलला की, पाठीवरच्या बोरीत टांगून भंगाराच्या दुकानात विकतात. सोबत चिल्ले-पिल्लेही जातात. शाळा शिकण्यापेक्षा कचरा वेचण्याला यांच्यालेखी किंमत! आरोग्याचा राष्ट्रीय कार्यक्रम दुर्गम भागात, गावखेड्यात पोहचला, मात्र राज्याची उपराजधानी असलेल्या दक्षिण नागपुरातील टोली वस्तीत पोहचलाच नाही. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह संबधितांशी संपर्क साधला असता, उपराजधानीत घरी प्रसूती झाल्याची नोंदच नाही.

दरवर्षी ५२ प्रसूती झोपडीतच

दरवर्षी ५० ते ५२ मातांची प्रसूती टोलीतील झोपडीतच होते. सासू किंवा दायीच ब्लेडने नाळ कापतात. आधारकार्ड नसल्याने माय गरोदरपणात कोणत्याच सरकारी दवाखान्यात जात नाही. दिवस भरताच प्रसूती वेदना सहन करत घरीच बाळाला जन्म देते. घरी जन्माला आलेल्या लेकरांची माहिती घेतली असता, काही महिन्यात १४ बालकांनी टोलीतील झोपडीत जन्म घेतला. टोलीत जन्माला आलेल्या शेकडो मुलांच्या जन्माची नोंद महापालिकेकडे नाही. जन्माची नोंदच नसल्याने आधार कार्ड आणि जातीचे प्रमाणपत्र तरी कसे मिळणार? टोलीत जन्माला आलेल्यांच्या वेदना, यातना त्यांचे दुःख ऐकले की, अंगावर शहारे येतात. टोलीत गरीबी,दुःखाचा वास असला तरी लेकापेक्षा लेकींच्या जन्माचा धुमधडाका जोरासोरात साजरा होतो, हे विशेष.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com