Crime News: खापा येथील १७ वर्षीय मुलीवर इन्स्टाग्रामवरील मैत्रीतून सावनेर तालुक्यातील एका लॉजवर बलात्कार करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याने पालकांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
खापा : खापा येथील मुलीवर बलात्कार केल्याची घटना सावनेर तालुक्यात घडली. १७ वर्षीय मुलीची इन्स्ट्राग्रामवर तरुणासोबत मैत्री झाली. त्याने तिला लॉजवर नेऊन अत्याचार केला. याबाबत पीडितेच्या तक्रारीवरून गुरुवारी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवत त्याला अटक केली.