नागपूर - पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण, बदलती जीवनशैली, लैंगिक शिक्षणाचा अभाव आणि आकर्षणासह अनेक कारणांमुळे कुमारी माता होण्याचे प्रमाण वाढले असून शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक असल्याचे पूर्व विदर्भातील आकडेवारीवरून समोर आले आहे. वर्षभरात पूर्व विदर्भात १३१ कुमारी माता आढळल्या आहेत.