मंदिर कुलूपबंद, तरि अधिक मासात ‘झुंज’ बंधाऱ्यावर वाढली पर्यटकांची झुंड

 थडीपवनीः  ‘झुंज’ बंधाऱ्यावर वाढलेली पर्टकांची गर्दी.
थडीपवनीः ‘झुंज’ बंधाऱ्यावर वाढलेली पर्टकांची गर्दी.

थडीपवनी (जि.नागपूर) :कोरोनाकाळात रोगाचा संसर्ग होऊ नये म्हणून शासनाने मंदिर, मश्‍जिद, गुरूद्वारे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. गेल्या सहा महिन्यांपासून सगळ्या भक्तांसाठी देवदर्शन करणे दुर्लभ झाले. सद्या हिंदूंचा पवित्र अधिक मास असतानाही देवधर्म ‘कुलूपबंद’ आहेत. मात्र थडीपवनी परिसरात या देऊळबंदीबर भाविकांनी उपाय शोधून काढला आहे.  अधिक मासात या झुंज बंधाऱ्यावर भाविक पुजाअर्चा करून रितीरिवाज साजरे करीत आहेत.

अधिक वाचाः जिंजर ते अंबाडा रस्त्यावर दोन महिन्यांपासून अवैध वृक्षतोड, वनविभागाचे दुर्लक्ष

महिलांनी शक्कल झुंज क्षेत्राला भेट देण्याची !
दर तीन वर्षांनी हिंदू धर्माच्या तिथीनुसार अधिक मास येतो. यावर्षी १८सप्टेंबर ते १६ऑक्टोबरपर्यंत अधिक मास सुरू आहे. वरुड तहसील व नरखेड तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता सर्वच धर्मातील प्रार्थना स्थळे, धार्मिक स्थळे कुलूपबंद’ करण्यात आली होती. सर्वच धार्मिक कार्यक्रम बंद होते. घराबाहेर फिरणेही बंद. अशात अधिक मासाची पर्वणी चालून आली. यात हिंदू धर्मात असलेली रुढी म्हणजे जावई व मुलीला घरी आणून वस्तूरूपात काहीतरी दान देणे व धार्मिकस्थळांना भेटी देणे वगैरे आलेच. परंतू कोरोनासंकट काळात कुठेही जाणे शक्य नसल्याने परिसरातील महिला मंडळींनी शक्कल लढवली, ती वघाळ झुंज क्षेत्राला भेट देण्याची.

पर्यटन, मौज व थोडाफार विरंगुळा
यावर्षी पावसाळा बऱ्यापैकी झाल्याने वर्धा नदीला पाणी भरपूर आहे. त्यात अप्पर वर्धा धरण पूर्ण भरले आहे. धरणाचे सुरवातीचे टोक म्हणजे वघाळ झुंज क्षेत्र. वर्धा नदीला स्वच्छ पाणी व सातशे फुटाचा धबधबा हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. जवळच कोल्हापूरी बंधारा. धबधब्याचे थंड तुषार अंगावर घेण्याची मजा. निसर्गसौंदर्य जबरदस्त. अधिक मासात अंघोळीला  अनन्यसाधारण महत्व. म्हणून दररोज हजाराहून अधिक मंडळी जावयांसह येथे दर्शन घेतात.  पर्यटन, मौज व कोरोनातून थोडा विरंगुळा घ्यायला वघाळ झुंजला भेटी देऊन जावयाला पावन केले की धर्माप्रमाणे वर्तन झाले असे मानतात. येथे वर्धा, नागपूर, अमरावती, मध्यप्रदेशातील बैतुलपासून दर्शनार्थी येत आहेत. हे ठिकाण अमरावती, नागपूर, वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर आहे. याच वेळी नव्हे तर भविष्यात कधीही सहल व पवित्र क्षेत्रास विरंगुळा म्हणून अवश्य भेट देऊन जीवनाचा आनंद घ्यावा, असे झुंज तीर्थ कमेटीचे नागरिकांना आवाहन आहे.

संपादक : विजयकुमार राऊत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com