maharashtra rajya pariksha parishad
sakal
नागपूर - शालेय शिक्षण विभागाने १३ फेब्रुवारी २०१३ रोजी आदेश काढून प्राथमिक शिक्षकांसाठी 'टीईटी' (शिक्षक पात्रता परीक्षा) बंधनकारक केली. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने त्यापूर्वी नोकरीला लागलेल्या शिक्षकांसाठी देखील ''टीईटी''चे बंधन घातले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार प्राथमिक शाळांवरील ज्या शिक्षकांचे वय ५३ वर्षे आहे, त्यांना दोन वर्षात ''टीईटी'' उत्तीर्ण व्हावीच लागणार आहे. राज्यात ५३ वर्षांवरील अंदाजे एक लाख ४९ हजार शिक्षक आहेत.