नागपूर : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र येतील यासाठी आम्ही आशावादी आहोत. भाजप मात्र दोन भाऊ आणि दोन पक्ष हे एकत्र येणार नाही यासाठी प्रयत्न करीत आहेत. घराघरात भांडण लावून राजकीय स्वार्थ साधणे हा भाजपचा अजेंडा आहे. राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आले तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ५४ टक्के मते या दोन भावांना मिळतील असा सर्वे आहे. त्यामुळे भाजप घाबरलेली असल्याचा दावा शिवसेनेचे नेते आणि विदर्भाचे संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना केला.