Social work : ऑटोचालक कोरोनाच्या संकटात वाहनातून करतोय निःशुल्क रुग्णवाहतूक

Social work : ऑटोचालक कोरोनाच्या संकटात वाहनातून करतोय निःशुल्क रुग्णवाहतूक

नागपूर : सेवा करण्याची इच्छा आणि मनोदयापुढे साधनांची मोजदाद केली जात नाही. अगदी आपल्या ताटातील चतकोर भाकरीचा तुकडा भुकेल्यांना देऊन सेवायज्ञ करता येते. संकटात सापडलेल्या रुग्णांकडून पैसे न घेता हॉस्पिटलपर्यंत (Hospital) पोहोचविण्याचे सेवाकार्य शहरातील आनंद वर्धेवार नावाचा ऑटोचालक (Auto driver) करीत आहे. लोकांच्या मजबुरीचा फायदा घेत दुप्पट-तिप्पट भाडे वसूल करणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम आनंद करीत आहे. त्यांच्या या सेवायज्ञाची शहरात सर्वत्र चर्चा असून कौतुकाचा वर्षाव होत आहे. (The auto driver does free patient transport in the corona crisis)

सध्या शहरावर कोरोना महामारीच्या रूपाने भयंकर आपत्ती कोसळली आहे. हजारो नागरिकांचे प्राण गेले तर कित्येक मृत्यूशी झुंज देत आहेत. अशा संकटाच्या काळातच समाजातील विविध घटकांचे खरे चेहरे समोर येत असतात. रुग्णालयांकडून उपचारासाठी उकळण्यात येणारे लाखो रुपये, ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरचा काळाबाजार, खाट उपलब्ध करून देण्यासाठी पैशाची मागणी, दहन घाटावर पीपीई किटसाठी नातेवाइकांची लूट करणे आणि रुग्णालयात पोहचविण्यासाठी शहर आणि आसपासच्या परिसरासाठी प्रचंड भाडे आकारण्याचे अत्यंत घृणास्पद प्रकार आणि माणुसकीला काळिमा फासणारे प्रकार नागपुरात उघडकीस आले आहेत.

Social work : ऑटोचालक कोरोनाच्या संकटात वाहनातून करतोय निःशुल्क रुग्णवाहतूक
VIDEO : चंद्रावर दफन केलेली एकमेव व्यक्ती माहिती आहे का?

अशा काळात आनंद वर्धेवार हे ऑटोचालक सेवाधर्माचे पालन करीत आहेत. कोरोनामुळे ऑटोचालकांची स्थिती काही चांगली नाही. पण आनंदने यांनी परिस्थितीला झुगारत रूग्णसेवेचा वसा घेतला. त्यांना रुग्ण आणि नातेवाइकांची तगमग पाहवत नव्हती. रुग्णांना घेऊन जात असताना ऑक्सिजन अभावी दोघांचा मृत्यू झाला. या घटनेने आनंद यांच्या मनावर मोठा आघात केला. त्यांनी रुग्णसंख्येचा संकल्प करीत विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांपुढे अडचणी मांडल्या.

सर्वांच्या सहकाऱ्यातून आवश्यक संसाधनांची जुळवाजुळव केली. ऑटोतच आवश्यक बदल केले. आरटीओकडून विशेष परवानगी घेऊन रुग्णसेवा सुरू करण्यात आली. रुग्णासाठी ७३५०१७९४८४ हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला. त्यावर कॉल येताच रात्री - अपरात्री ते ऑटो घेऊन रुग्णाच्या घरी पोहोचतात. तातडीने रुग्णालयात पोहोचवून देतात. रुग्णाची अवस्था लक्षात घेऊन ऑक्सिजन उपलब्ध करून देतात. या संपूर्ण सेवेसाठी ते कोणतेही शुल्क आकारत नाहीत. आवश्यक तेवढे सहकार्य ते करतात. गेल्या २५ दिवसांपासून ही उपक्रम सुरू असून अनेकांनी लाभ घेतला आहे.

एखाद्या वस्तूचा उपयोगच केला नाही तर ती गंजते. अधिक वापर केल्यास झिजते. काहीही झाले तरी प्रत्येकाचा शेवट ठरलेलाच. गंजण्यापेक्षा उतरांच्या सुखासाठी झिजणे अधिक चांगले. या भावनेतूनच कार्य करतो आहे.
- आनंद वर्धेवार

(The auto driver does free patient transport in the corona crisis)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com