विदर्भातील सागवान सर्वोत्तम : श्रीनिवास राव | Nagpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांबू क्षेत्रातील औद्योगिक संधी कार्यशाळा

नागपूर : विदर्भातील सागवान सर्वोत्तम : श्रीनिवास राव

नागपूर : विदर्भातील सागवान हा सर्वोत्तम आहे. या प्रजातीच्या जातीही महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाकडे उपलब्ध आहेत. अगरबत्तीच्या निर्मितीसाठी मंडळाने बांबूच्या तीन प्रजाती शोधल्या आहेत,१ अशी माहिती महाराष्ट्र बांबू विकास महामंडळाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि व्यवस्थापकीय संचालक एस. श्रीनिवास राव यांनी येथे दिली.

‘एमएसएमई फोरम ऑफ विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन’ आणि महाराष्ट्र बांबू विकास मंडळातर्फे आयोजित ‘बांबू क्षेत्रातील औद्योगिक संधी’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी व्हीआयएचे अध्यक्ष सुरेश राठी, सहसचिव अनिता राव, एन्सेफॅलॉन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक के. साथियानाथन, रामनिवास पांडे, व्हीआयएचे उपाध्यक्ष सुहास बुद्धे, गिरीश देवधर उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, ‘बांबू उत्पादकांसाठी खरेदीदार आणि विक्रेत्यांच्या सुविधांसाठी एक ई-प्लॅटफॉर्म विकसित केला आहे.

हेही वाचा: नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचे कच्चे प्रारूप होणार तयार

महाराष्ट्रात एकट्या गडचिरोली जिल्ह्यात ८० टक्के बांबूची लागवड केली होती. राज्यातील बांबू लागवडीवर देखरेख ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मंडळाची स्थापना केली आहे. त्यामध्ये शेतजमिनींवर वृक्षारोपण आणि पूरक आहारावर अधिक भर देण्यात आला आहे. शेतीचे उत्पन्न आणि हवामान बदलासाठी लवचिकता तसेच उद्योगांच्या दर्जेदार कच्च्या मालाची उपलब्धता यासाठी धोरण निश्चित केले आहे.’ बांबू मंडळाच्या मदतीने किमान पाच ते दहा उद्योजकांनी पुढे येऊन या क्षेत्रात त्यांचे युनिट्स स्थापन करायला हवेत, असे व्हीआयएचे अध्यक्ष सुरेश राठी यांनी सांगितले. सहसचिव अनिता राव, ‘एन्सेफॅलॉन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे’ व्यवस्थापकीय संचालक के. साथियानाथन यांची भाषणे झाली. आभार सुनील जोशी यांनी मानले.

loading image
go to top