रेमडिसिव्हीरच नव्हे तर म्युकरमायकोसिस इंजेक्शनचा काळाबाजार?

रेमडिसिव्हीरच नव्हे तर म्युकरमायकोसिस इंजेक्शनचा काळाबाजार?

नागपूर : कोरोनातून (coronavirus) बरे झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार दिसून येत आहे. त्यामुळे या आजारावरील अँटी-फंगल इंजेक्शन (Anti fungal injection) ‘अम्फोटेरिसिन-बी’चा तुटवडा निर्माण झाला आहे. पूर्वी हे इंजेक्शन २ हजार ६०० रुपयांना मिळत होते. परंतु, ५० ‘एमजी’च्या मिळणाऱ्या इंजेक्शनवर जीएसटीत वाढ झाली. उत्पादन खर्च वाढला यामुळे आता ६ हजार ५०० रुपये मोजावे लागत आहेत. मात्र, ‘अम्फोटेरिसिन-बी’इंजेक्शनचा काळाबाजार (Black market) केला जात आहे. हे इंजेक्शन १५ हजार रुपयांना विक्री केले जात आहे. (The black market for mucomycosis injections)

कोरोनावरील उपचारात स्टेरॉईडचा वापर झाल्यानंतर श्वसनयंत्रणेवर बराच काळ, मधुमेह असलेल्या रुग्णांना बुरशीजन्य आजाराचा धोका आहे. अलीकडे या आजाराच्या रुग्णांची संख्या नागपुरात वाढली आहे. सध्या मेडिकलमध्ये या आजाराने बाधित असलेले ६० पेक्षा अधिक रुग्ण उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. यातील २५ जणांवर शस्त्रक्रिया झाली आहे. मत्र यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. कोरोनातून बरे झालेल्यांना मधुमेह असल्यास त्यांना म्युकरमायकोसिसचा धोका अधिक आहे. अशा कोरोना रुग्णांना स्टेरॉइडचे डोस दिल्यानंतर म्युकरमायकोसिस होत असल्याचे दिसून येत आहे.

रेमडिसिव्हीरच नव्हे तर म्युकरमायकोसिस इंजेक्शनचा काळाबाजार?
होमगार्डने केला डॉक्टर युवतीवर बलात्कार; वर्दीचा धाक दाखवून शोषण

नागपूर जिल्ह्यात बुरशीजन्य आजाराच्या ३०० वर रुग्णांची नोंद झाली आहे. मेडिकलमध्ये ३३ रुग्णांवर शस्त्रक्रिया होणे शिल्लक आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार, या रुग्णांच्या शस्त्रक्रियेदरम्यान नाकाची शस्त्रक्रिया करण्यात येते. यात रुग्णाच्या नाकात अर्थात सायनसमध्ये जमलेली काळी बुरशी (ब्लॅक फंगस ) काढण्यात येते. वेळेवर काढण्यात आले नाही तर ती बुरशी दातांपर्यंत पसरते. यामुळे जबडा काढण्याची वेळही उद्भवू शकते. मेडिकलमध्ये अधिकांश रुग्णांच्या नाकाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

एका रुग्णाला ५० ते ९० डोस

बुरशीजन्य आजार असलेल्या रुग्णाला एकाचवेळी चार ते पाच अम्फोटेरिसिन-बी’ (५० एमजी) इंजेक्शन लावण्यात येतात. संपूर्ण उपचारादरम्यान ५० ते ९० डोस वापरले जातात. काही रुग्णांना प्रथमच १० डोस एकाचवेळी लागू शकतात. यामुळेच म्युकरमायकोसिस अर्थात बुरशीचे उपचारदेखील महागले आहेत. त्यामुळे ‘अम्फोटेरिसिन-बी’चा तुटवडा निर्माण झाला आहे.

रेमडिसिव्हीरच नव्हे तर म्युकरमायकोसिस इंजेक्शनचा काळाबाजार?
वर्धेत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी; कोरोनावर केली होती मात
पूर्वी बुरशीजन्य आराजावर ‘अम्फोटेरिसिन-बी’चे इंजेक्शन होते. परंतु, त्यावेळी या इंजेक्शनची मागणी मर्यादित होती. परंतु, आता रुग्णसंख्या वाढल्याने या इंजेक्शची मागणी वाढली आहे. ‘अम्फोटेरिसिन-बी’चे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनीही किमतीमध्ये वाढ केली. यामुळे ग्राहकांसाठी इंजेक्शन चढ्या भावाने विकण्यात येत आहे. पूर्वी १५०० ते १८०० जीएसटीत पडत होते. या इंजेक्शनची एमआरपी ६ हजार ८०० रुपये आहे.
- अजय सोनी, अध्यक्ष, अखिल भारतीय फार्मासिस्ट वेलफेअर असोसिएशन

(The black market for mucomycosis injections)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com