
जलालखेडा (जि. नागपूर) : नागपुरी संत्री असं नुसतं नाव जरी काढलं तरी अनेकांना या भागातील संत्रा फळाबद्दल आकर्षक वाटते. परंतु ही संत्री पिकवणारा शेतकरी मात्र सलग चौथ्या वर्षी मेटाकुटीला आला आहे. त्याच मुख्य कारण म्हणजे संत्राबागांना लागलेली गळती. मागील दोन महिन्यांपासून अति पावसामुळे संत्राउत्पादक शेतकरी हलाखीच्या परिस्थितीमध्ये सापडला आहे. सुरुवातीला हजारो संत्रा फळांनी बहरलेल्या संत्रा झाडावर मात्र आता निम्यापेक्षाही कमी संत्री शिल्लक नाही.
मागील चार वर्षापासून संत्रा बागांना पाऊस हा क्षमतेपेक्षा जास्त होत आहे. त्यामुळे संत्राचे देठ सुकण्याचे प्रमाण वाढले आहे. बुरशीमुळे फंगस देखील वाढले आहेत. त्यात संत्राचे दिवस पूर्ण झाल्याने बुरशी वाढली आहे. त्यामुळे गळती वाढली आहे. संत्राची मोठ्या प्रमाणावर होत असलेली गळती थांबवण्यासाठी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी हजारो रुपयांची महागडी फवारणी केली. पण गळत मात्र थांबली नाही व ती अनवरतपणे सुरूच आहे. भाव नसल्याने व्यापारी देखील सुप्त आहे. संत्रा घ्यायला कोणी तयार नाही. यामुळे संत्राउत्पादक अस्मानी व सुलतानी संकटात भरडला जात आहे.
सुरवातीला झाडावर २० कॅरेट संत्रा होते, संत्रा फुटायला सुरुवात झाली. तेव्हा जवळपास एका झाडावर वीस कॅरेट संत्री होती. परंतु आता मात्र आठ कॅरेट सुद्धा संत्री शिल्लक नाही. दरवर्षी दसरा सणापर्यंत संत्रा उत्पादक शेतकरी आपल्या संत्र्याच्या बागा विकून मोकळी होत असतात. परंतु दसरा उलटून सुद्धा हजारो संत्रा बागा विकायचा बाकी आहे.
-मिलिंद कळंबे, संत्राउत्पादक शेतकरी, जलालखेडा
सुरुवातीला तीस ते पस्तीस रुपये किलो संत्रा विकत होता. परंतु आता दहा ते बारा रुपये किलोपर्यंत संत्रा व्यापारी मागत आहे. जो बगीच्या पाच लाख रुपयांचा होता तो आता एक लाख रुपयाला, व्यापारी मागत आहे. एकीकडे लावलेला खर्च ही अशात निघणे कठीण आहे व त्यात गळलेले संत्रा उचलण्यासाठी लागलेला खर्च वेगळाच. अशात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी करावे तरी काय?
- दीपक वर्मा, शेतकरी, उमठा
संत्रा गळतीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. जिल्ह्यातील काटोल, कळमेश्वर, नरखेड या तालुक्यांमध्ये मोठा प्रभाव दिसत आहे. शेतकरी महागडी औषधे वापरत असला तरी याचा काहीएक फायदा होत नाही. परिणामी आर्थिक खर्चात वाढ आणि उत्पन्न कमी अशा अवस्थेत शेतकरी अडकला आहे. तर शासनाकडून अजूनही ठोस मदत मिळाली नाही.
- वसंत चांडक, माजी सभापती, पंचायत समिती, नरखेड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.