esakal | ...तर काँग्रेसचे अध्यक्षपद प्रियंका गांधींनी स्वीकारावे
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul and Priyanka Gandhi

...तर काँग्रेसचे अध्यक्षपद प्रियंका गांधींनी स्वीकारावे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : राहुल गांधी यांची काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होण्याची इच्छा नसेल तर प्रियंका गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी काँग्रेसचे महासचिव व माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केली आहे. ते नागपुरात वनराई फाउंडेशनच्यावतीने आयोजित ‘इंदिरा गांधी यांचे वनसंरक्षणावर योगदान’ या विषयावरील कार्यशाळेत बोलत होते.

मागील दोन वर्षापासून काँग्रेसला कायमस्वरूपी अध्यक्ष नाही. काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी सर्वांकडून होत होती. त्यामुळे आता पक्षाची सूत्रे प्रियंका गांधी यांनी स्वीकारावी. राहुल किंवा प्रियंका गांधी अध्यक्ष व्हावे ही काँग्रेसच्या तमाम कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

हेही वाचा: ‘महाराष्ट्र बंद’ला राज्यभरात मोठा प्रतिसाद; अनेक ठिकाणी तणाव

येत्या काळात होऊ घातलेल्या पाच राज्याच्या निवडणुका आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवून देण्याची क्षमता प्रियंका गांधीमध्ये आहे. या देशासाठी, शेतकरी, गोरगरीब आणि सामान्य जनतेसाठी त्या चांगले काम करू शकतात. कॉंग्रेसला एकसंघ ठेवून नेतृत्व करण्याची ताकद गांधी घराण्यात आहे.

काँग्रेस हाच देशाला विकासाच्या दिशेने १०० पाऊले पुढे नेऊ शकेल. प्रियंका गांधी यांची कार्यशैलीही इंदिरा गांधीप्रमाणेच आहे. इंदिरा गांधी यांची छबी श्रीमती प्रियंका गांधी यांच्यामध्ये दिसते. लखीमपूरच्या घटनेत मध्यरात्री तीन वाजता प्रियंका गांधींनी पोलिसांशी भिडून रणरागिणी बनत शेतकऱ्यांच्या मदतीला धावून गेल्या. या देशाला काँग्रेसच वाचवू शकतो आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात ते शक्य होऊ शकेल, असे आशिष देशमुख यावेळी म्हणाले.

loading image
go to top