अभ्यासाचा भाग म्हणून केली सुरुवात अन्‌ 15 हजारांत बनवले हे यंत्र

Thermogravimetric analysis device was created by the students in fifteen thousand
Thermogravimetric analysis device was created by the students in fifteen thousand
Updated on

नागपूर : विज्ञान विषयातील प्रकल्पावर संशोधन करताना त्यासाठी विविध प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतात. यासाठी मोठा खर्च येतो. ही यंत्रे महागडे असल्याने ती खरेदी करणे महाविद्यालयांना परवडत नाही. त्याचा फटका संशोधकांना बसतो. हे लक्षात घेत शिवाजी विज्ञान महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी आठ लाखांचे यंत्र "थर्मोग्रॅव्हिमॅट्रिक ऍनालेसिस" (टीजीए) हे उपकरण फक्त 15 हजारांत तयार करीत अनेकांना आश्‍चर्याचा धक्का दिला आहे.

संशोधकांना त्यांचे नमुने तपासण्यासाठी बरीच अडचण आहे. कारण, तेथे पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नमुन्यांची चाचणी करण्यासाठी खूप खर्च करावा लागतो. यामुळे संशोधकांना बरीच अडचण होते. ही अडचण ओळखून योगेश निमजे आणि सागर पाईकमारे एम.एसस्सी. पदार्थ विज्ञान अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी "थर्मोग्रॅव्हिमॅट्रिक ऍनालेसिस" (टीजीए) हे उपकरण तयार करण्याचा निर्णय घेतला.

अभ्यासक्रमाचा भाग म्हणून त्यांनी हे उपकरण तयार करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे हे उपकरण खरेदी करण्यासाठी बाजारात आठ लाखांपर्यंत किंमत मोजावी लागते. त्यामुळे ते कमी दरात तयार करता यावे यासाठी त्यांना महाविद्यालयाकडून आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला. या मदतीतून विद्यार्थ्यांनी अगदी पंधरा हजारांत उपकरण तयार करण्यात यश मिळविले. उपकरणाद्वारे 10 मायक्रोग्रमपर्यंत वजन "डिटेक्‍ट' करते.

मटेरिअलचे तापमान वाढत जाते, त्याचा सुक्ष्म अभ्यास या उपकरणातून शक्‍य आहे. विद्यार्थ्यांच्या या संशोधनाबद्दल विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महेंद ढोरे यांनी विद्यार्थ्यांचे आणि भौतिकशास्त्र विभागाच्या टीमचे डॉ. एस. डब्ल्यू अनवाणे, विभाग प्रमुख (पदार्थ विज्ञान), प्रो. सी रुचिर कुमार आणि श्री रोशन नाईक यांच्या कामासाठी अभिनंदन केले आहे.

रामन इनोव्हेशन फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शन

रामन विज्ञान केंद्राद्वारे आयोजित इनोव्हेशन फेस्टिव्हलमध्ये "थर्मोग्रॅव्हीमॅट्रिक ऍनालेसिस" (टीजीए) हे उपकरण प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यात उपकरणाला एक हजारांचे रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले आहे. शिवाय संशोधकांनी विद्यार्थ्यांचे नावीन्यपूर्ण संशोधनासाठी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com