
अतुल मांगे/प्रतीक बारसागडे
नागपूर : कुणी खेळाकडे करिअर म्हणून पाहतो तर कुणी वेळ घालवण्यासाठी खेळात रमतो. परंतु नागपूरनगरीत असे दोन अवलिया मित्र आहेत जे जागा आणि वेळ मिळेल तिथे चौसष्ट घरांचा खेळ मांडतात. दोघेच खेळण्यात एवढे रमतात की त्यांना रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र कधी होते, याचे भान राहात नाही. अजिज खान आणि शब्बीर शेख अशी या मित्रांची नावे आहेत.