
नागपूर : कोतवाली परिसरातील महालामध्ये राहणाऱ्या प्लास्टीक कंपनीच्या व्यापाऱ्याच्या घरात चोरट्यांनी शिरून ५ लाख रोख रकमेसह सोन्या-चांदी आणि हिऱ्याचे दागिने असा पंचविस लाख रुपयांचे दागिने लंपास केले. ही घटना रविवारी (ता.१) पहाटे पाच वाजताच्या सुमारास उघडकीस आली. संकेत हरीश जसानी (वय ३१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.