esakal | धक्कादायक प्रकार! मृतदेहाच्या अंगावरील दागिने लंपास; नागपूरच्या मेयो रुग्णालयातील घटना 
sakal

बोलून बातमी शोधा

thieves theft ornaments from dead woman mortal

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर ज्ञानेश्वर बागडकर (वय ३२ रा. वॉर्ड क्रमांक दोन, खापरखेडा) यांच्या आई पुष्पा बागडकर (वय ५५) यांची ऑक्टोबर महिन्यात प्रकृती खालावली. सागर यांनी पुष्पा यांना मेयो हॉस्पिटलमधील वॉर्ड क्रमांक ४१ मध्ये दाखल केले. 

धक्कादायक प्रकार! मृतदेहाच्या अंगावरील दागिने लंपास; नागपूरच्या मेयो रुग्णालयातील घटना 

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर ः  मेयोच्या शवविच्छेदन गृहात पोस्टमॉर्टमसाठी आलेल्या मृतदेहाच्या अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले. हा धक्कादायक प्रकार मेयो हॉस्पिटलमध्ये उघडकीस आला. याप्रकरणी तहसील पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी एका परिचारिकेवर संशय व्यक्त केला असून तिच्यासह काहींना चौकशीसाठी बोलविण्यात येणार असल्याची माहिती तहसील पोलिसांनी दिली.

सविस्तर वाचा - शेतमजूर असलेल्या दिलीपची ही संपत्ती पाहून व्हाल थक्क; संग्रहात आहेत तब्बल ५० हजार अमूल्य वस्तू 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर ज्ञानेश्वर बागडकर (वय ३२ रा. वॉर्ड क्रमांक दोन, खापरखेडा) यांच्या आई पुष्पा बागडकर (वय ५५) यांची ऑक्टोबर महिन्यात प्रकृती खालावली. सागर यांनी पुष्पा यांना मेयो हॉस्पिटलमधील वॉर्ड क्रमांक ४१ मध्ये दाखल केले. उपचारावेळी पुष्पा यांच्या बोटात अंगठी, गळ्यात सोन्याचे डोरल्यासह ३५ हजार रुपये किमतीचे दागिने होते. 

उपचारादरम्यान १६ ऑक्टोबरला उपचारादरम्यान पुष्पा यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला. यादरम्यान मृतदेहाच्या अंगावरील दागिने चोरी झाले. ही बाब सागर यांच्या लक्षात आली. त्यांनी तहसील पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी चौकशी करून चोरीचा गुन्हा दाखल केला. 

हेही वाचा - आनंदवनातील वाद : शीतल यांचे आरोप तथ्यहीन, आमटे कुटुंबीयांनी जारी केले निवेदन 

पोलिसांनी मेयो हॉस्पिटल प्रशासनाला सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली.मात्र अद्यापही पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज देण्यात आले नाही. सागर यांनी एका परिचारिकेवर संशय व्यक्त केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीनंतर पुढील कारवाई करण्यात येईल, अशी माहिती तहसील पोलिसांनी दिली.

संपादन - अथर्व महांकाळ 
 

loading image