
Nagpur Ring Road
sakal
नागपूर: शहरातील इनर आणि आउटर रिंगरोडवरील गर्दी वाढल्याने तिसरा रिंगरोड उभारण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी आवश्यक जमिनींच्या भूसंपादनासाठी हुडकोकडून घेण्यात येणाऱ्या सुमारे ४ हजार ८०० कोटीच्या कर्जास शासनाकडून हमी देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय गुरुवारी (ता.९) वित्त विभागाने जारी केला आहे.