Nagpur Crime : पोलिसांना डांबून छत्तीसगडमधून पळालेल्या तिघींना अटक

Nagpur Crime Update : पोलिसांनी तिघींनाही लकडगंज वाहतूक शाखा कार्यालयात नेले. तिथे विचारणा केल्यावर त्या छत्तीसगड येथील असल्याचे समजले.
Three arrested who escaped from Chhattisgarh
Three arrested who escaped from Chhattisgarh sakal

Nagpur News : छत्तीसगडच्या बालसुधारगृहातील पोलिसांना डांबून ठेवत तेथून पळ काढून नागपुरात आलेल्या तीन अल्पवयीन मुलींना महिला वाहतूक पोलिसांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे वर्धमाननगरातून अटक केली. ही घटना शनिवारी (ता.६) दुपारच्या सुमारास उघडकीस आली.

वैशाली दुरुगकर आणि पूजा पुरी या महिला वाहतूक पोलिस वर्धमाननगर परिसरात कर्तव्यावर असताना, त्यांना एका विनाक्रमांकाच्या दुचाकीवरून तीन मुली जाताना आढळल्या. त्यांना थांबवून गाडीच्या कागदपत्रांची विचारणा केली असता, त्यांनी ते नसल्याचे सांगितले. त्यांनी काही पैसे घेऊन गाडी सोडण्याची विनंती केली. मात्र, त्यास नकार दिल्यावर एकीने त्यांना भंडाऱ्यातील रहिवासी असल्याचे सांगून आई-बाबांशी भांडण झाल्याने नागपुरात आल्याची बतावणी केली.

आता घरी परत जायचे असल्याने तुम्ही गाडी स्वतःजवळ ठेवून आम्हांला सोडा अशी विनंतीही केली. मात्र, तिच्यावर विश्‍वास न ठेवता, तिघींनाही मोबाइलची मागणी केली. तिघींनीही मोबाइल नसल्याचे सांगितले. पोलिसांनी खडसावून विचारताच एकीने जवळील मोबाइल काढून दिला. त्यावरून पहिला डायल कॉल लावताच, समोरून एका मुलाने ‘तुम्ही अद्याप आल्या का नाही?’ अशी विचारणा केली.पान २ वर

छत्तीसगडमधून पळालेल्या तिघींना अटक

पोलिसांनी तिघींनाही लकडगंज वाहतूक शाखा कार्यालयात नेले. तिथे विचारणा केल्यावर त्या छत्तीसगड येथील असल्याचे समजले. त्यांचा रेकॉर्ड तपासला असता, १६ आणि १७ वर्षांच्या दोन मुलींवर खुनाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असल्याचे समजले. त्यात एकीने प्रियकराच्या मदतीने एका युवकाला तर दुसरीने भावाच्या मदतीने एकाचा खून केल्याची बाब समोर आली. १४ वर्षीय मुलगी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी होती. पोलिसांनी छत्तीसगड पोलिसांना सूचना देत तिघींनाही त्यांच्या ताब्यात दिले.

Three arrested who escaped from Chhattisgarh
Nagpur Cyber Crime : कधी शेअर तर कधी टास्कचे आमिष; दररोज वीस जणांची सायबर फसवणूक

बालसुधारगृहात लावली आग

छत्तीसगडच्या बालसुधारगृहातून पलायन करताना, तिघींनीही बाथरूममध्ये रॉकेल टाकून आग लावली. त्यानंतर आरडाओरड करून तेथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना डांबून दुचाकीवरून नागपूर गाठले. दरम्यान तिघींनीही रात्री मद्यपान केले. नागपुरात आल्यावर त्या सकाळी इतरत्रही फिरल्या.

‘लाइफ सेटल करणा है मॅम’

छत्तीसगडच्या बालसुधारगृहातून पलायन करणाऱ्या तिघींपैकी एकीचा प्रियकर हा भंडाऱ्यात असल्याची माहिती मिळाली. बालसुधारगृहातून पळून कुठेतरी त्याच्यासोबत लाइफ सेटल करायचे आहे, अशी बतावणीही तिने केली. विशेष म्हणजे, त्यातील एकीने ती आर्किटेक्ट असल्याचीही बतावणी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com