esakal | नागपूर : वीज पडून तीन शेतमजुरांचा मृत्यू; दोघे सुदैवाने बचावले
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर : वीज पडून तीन शेतमजुरांचा मृत्यू; दोघे सुदैवाने बचावले

नागपूर : वीज पडून तीन शेतमजुरांचा मृत्यू; दोघे सुदैवाने बचावले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रामटेक (जि. नागपूर) : तालुक्यातील चोरखुमारी शिवारात माजी पंचायत समिती सदस्य हरिसिंह धोंडबा सोरते यांचे शेत आहे. मंगळवारी (ता. ६) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास अचानक वीज पडून कोसळल्याने शेतातील झोपडीत थांबलेल्या पाच पैकी तिघांचा (Three farmers killed) मृत्यू झाला. अन्य दोघे किरकोळ जखमी झालेत. दिलीप मंगल लांजेवार (वय ४६, रा. डोंगरी), मधुकर पंधराम (वय ५२, रा. चोरखुमारी) व योगेश अशोक कोकण (वय २७, रा. चोरखुमारी) अशी मृतांची नावे आहेत. (Three-farmers-killed-in-lightning-strike-in-Nagpur-district)

प्राप्त माहितीनुसार, रामटेक तालुक्यातील चोरखुमारी शिवारात माजी पंचायत समिती सदस्य हरीसिंह सोरते यांची शेती आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतात काम सुरू आहे. मंगळवारी शेतामध्ये ट्रॅक्टरने नांगरणी सुरू होती. दुपारच्या सुमारास अचानक आभाळ भरून आले व जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे शेतातील मजूर आसऱ्याच्या शोधात पळत सुटले.

हेही वाचा: बदली रद्द करण्यासाठी यवतमाळ जल्ह्यातील आर्णी उद्या बंद

यातील शेतमालक हरीसिंह सोरते (५२, रा. शीतल वाडी रामटेक), दिलीप मंगल लांजेवार (४२, रा. डोंगरी), ट्रॅक्टर मालक योगेश अशोक कोकण (३०, रा. चोरखुमारी), शेजारच्या शेतात गुरे राखत असलेले गुराखी मधुकर सावजी पंधराम (५९) व नातू नेहाल रामसिंग कुमरे (१२) दोघेही राहणार चोरखुमारी हे पाचही जण शेतातील झोपडीत थांबले. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते.

नेमका याचवेळी काळाने डाव साधला. काळ्याकुट्ट आभाळात जोरदार वीज कडाडली आणि झोपडीवर कोसळली. यात योगेश कोकण, मधुकर पंधराम, दिलीप लांजेवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. नशीब बलवत्तर म्हणून झोपडीतच असलेले हरीसिंह सोरते व नेहाल रामसिंग कुंभरे यांचे प्राण वाचले. ते यात किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारार्थ तातडीने रामटेकच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याचे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.

(Three-farmers-killed-in-lightning-strike-in-Nagpur-district)

loading image