esakal | ठाणेदाराची बदली रद्द करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी उद्या बंद
sakal

बोलून बातमी शोधा

बदली रद्द करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी उद्या बंद

बदली रद्द करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी उद्या बंद

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आर्णी (जि. यवतमाळ) : शहरासह तालुक्यातील अवैध धंबे बंद करण्यासह वादग्रस्त प्रेमनगर हटविण्याची धाडसी कारवाई करणारे ठाणेदार पितांबर जाधव (Thanedar Pitambar Jadhav) यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात उचलबांगडी (policeman transferred Suddenly) करण्यात आली. त्यांच्या जागेवर अमोल माळवे यांची नियुक्ती केली. बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी अर्णीकर सरसावले असून, बुधवारी (ता. सात) शहर बंदची (City closed on Wednesday) हाक देण्यात आली आहे. (The-policeman-from-Arni-in-Yavatmal-district-was-transferred-Suddenly)

आर्णीचे ठाणेदार म्हणून जाधव यांनी सहा महिन्यांपूर्वीच सूत्रे स्वीकारली होती. धाडसी कारवाया करीत जनसामान्यांच्या मनात त्यांनी वेगळा ठसा उमटविला होता. कित्येक वर्षांपासून शहराच्या मध्यभागी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून प्रेमनगरात देहविक्रय व्यवसायाआड अवैध धंदे चांगलेच फोफावले होते. ते अतिक्रमण काढण्याचे धाडस ठाणेदार जाधव यांनी दाखविले.

रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांना शिस्त लावल्याने रस्त्यांनी मोकळा श्‍वास घेतला. गुटखातस्करांवर कारवाई केली. कर्तव्यदक्ष म्हणून त्यांनी ठसा उमटविला. मात्र, प्रेमनगर उठविल्याने मटका अड्डे बंद झालेत. त्याआड काहींनी पॉवरफुल्ल राजकारण केले. त्यासाठी बदली हे प्रमुख कारण ठरल्याची चर्चा आहे.

हेही वाचा: १२ वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराने लग्न करताच प्रेयसीची आत्महत्या

ठाणेदार जाधव यांची बदली रद्द करण्यात यावी, या मागणीचे निवेदन राजकीय पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात दिले. बदली रद्द होत नाही, तोपर्यंत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर तालुका शिवसेनाप्रमुख रवी राठोड, सामाजिक कार्यकर्ते गोपाल कोठारी, भाजपचे तालुकाध्यक्ष विपिन राठोड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील भारती, नगरसेवक निलंकुश चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

(The-policeman-from-Arni-in-Yavatmal-district-was-transferred-Suddenly)

loading image