Accident News: भरधाव ट्रकने दुचाकीवरील चौघांना उडवलं; आई वडिलांसह मुलीचा मृत्यू

अपघातात मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत
Accident News
Accident NewsEsakal

गेल्या काही दिवसांपासून अपघातांच्या संखेत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सध्या नागपूरमधून अशीच एका दुर्देवी अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. (Accident News)

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातून एकाच कुटूंबातील तिघांना जीव गमवावा लागला आहे. नागपूर जिल्ह्याच्या रामटेक जवळील आमडी फाट्यावर हा भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये बाईक वरून चौघांना भरधाव ट्रकने उडवल्याचे समोर आले आहे. या अपघातात आई,वडील आणि मुलीचा जागीच मृत्यु झाला आहे.

Accident News
Pankaja Munde: पंकजा मुंडेंना मोठा धक्का! अंबाजोगाई बाजार समितीत महाविकास आघाडीचा विजय

तर मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भयंकर अपघाताच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या फाट्यावर वारंवार अपघात झाल्याचे समोर येत असून या ठिकाणी अंडरब्रिजची मागणी करण्यात येत आहे.

या अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर बहतुक कोंडी झाली होती. दरम्यान दिवसेंदिवस अपघातांच्या संखेत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

Accident News
Amit Shah: राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरु असतानाच CM शिंदे अमित शहांना भेटणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com