
नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री शिवसैनिक असतानाही नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सेनेला गळती (nagpur shivsena) लागली आहे. वर्षभरात तीन तालुका प्रमुखांनी राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ही सेनेसाठी धोक्याची घंटा असून असेच सुरू राहिले तर रामटेक लोकसभा मतदारसंघही (ramtek lok sabha constituency) गमवायला वेळ लागणार नाही, असे मानले जात आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने शिवसेनेत उत्साह निर्माण होईल, युतीच्या जोखडातून सुटका झाल्याने भाजपचा दबाव झुगारून विस्तारलाही मोठा वाव मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती. हे लक्षात घेऊन जिल्ह्यात नवे चेहरे शिवसेनेने दिले. त्याचा फायदा होण्याऐवजी तोटाच होताना दिसत आहे. शहरात मोठी फूट पडली आहे तर ग्रामीणमध्ये गळती लागली आहे. भिवापूरचे तालुका प्रमुख शेखर दडमल आणि कुहीचे तालुका प्रमुख हरीश कडव काँग्रेसवासी झाले आहेत. एकेकाळी शिवसेनेचे कट्टर समर्थक असलेले जिल्हा परिषद सदस्य तापेश्वर वैद्य आधीच शिवसेनेतून बाहेर पडले आहेत. रामटेकचे आमदार ॲड. आशिष जयस्वाल यांच्यावर शिवसेनेचे सहयोग सदस्य होण्याची वेळ ओढवली आहे.
दिवसेंदिवस शिवसेनेतील खदखद वाढत चालली आहे. शासकीय समित्यांवर नेमणूक केली जात नाही. काँग्रेसची कुरघोडी सुरू आहे. सत्ता असतानाही कामे होत नसल्याने त्यापेक्षा काँग्रेस बरी अशी भावना शिवसैनिकांमध्ये बळावत चालली आहे. त्यामुळे पक्ष सोडणाऱ्यांची संख्या आणखी वाढलेली दिसेल असे एका निष्ठावंताने सांगितले. समित्या वाटपाचे सूत्र ठरले असतानाही पालकमंत्री नितीन राऊत आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार शिवसेनेला प्रतिनिधित्व देत नसल्याच्या तक्रारी आहेत. तालुका प्रमुख देवेंद्र गोडबोले यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे याची तक्रार केली आहे. जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीत आघाडी कायम असतानाही काँग्रेसच्या नेत्यांनी चर्चा करण्याचेही टाळले. शेवटपर्यंत झुलवत ठेवले. अखेर शिवसैनिकांनी स्वबळावर अर्ज दाखल केले होते.
शहरातही असंतोष -
नागपूर शहराचे नेतृत्व आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्यावर सोपवण्यात आले. नवीन कार्यकारिणी करताना जुन्या पदाधिकाऱ्यांचे त्यांनी डिमोशन करून आपल्या समर्थकांना बढती दिली. त्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी फूट पडली आहे. कार्यकारिणीत समावेश केलेल्यांनी अद्यापही पदभार स्वीकारला नाही. काहींनी पदांचे राजीनामे दिले. ते सर्व ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.