Nagpur Bus Tiffin Bomb: नागपूरच्या बसस्थानकात आढळला 'टिफिन बॉम्ब'; तीन दिवस डेपोतच होती उभी बस

Nagpur Bus Tiffin Bomb: एसटीच्या गडचिरोलीहून आलेल्या बसमध्ये आढळला बॉम्ब, गणेशपेठ बस स्थानकातील घटना
nagpur bus bomb
nagpur bus bomb esakal

नागपूर : ता. ७ : गडचिरोली आलेल्या बसमध्ये आज सकाळी पावणे बारा वाजता सुमारास बॉम्ब सदृश्य आढळून आल्याने एकच खळबळ माजली. पोलिसांनी बॉम्ब ताब्यात घेतला असून सुराबर्डी येथे निकामी करण्यासाठी नेण्यात आला नेण्यात आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

गडचिरोली येथून MH 40 Y 5097 या क्रमांकाची बस एक फेब्रुवारीला गणेश पेठ स्थानकात रात्री होलटींगसाठी आली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गाडीचे काम निघाल्याने ही गाडी गणेश पेठ आगारात उभी होती. (Tiffin Bomb Found in Nagpur Bus Station bus was standing at depot from three days)

nagpur bus bomb
PM Modi in Rajya Sabha : 'मला कोणतेही आरक्षण पसंत नाही, नोकरीत तर नाहीच', PM मोदींनी वाचून दाखवलं नेहरूंचं पत्र

काही सामान दोन फेब्रुवारीला तर उर्वरित सामान तीन आणि चार फेब्रुवारीला आलाय. 6 फेब्रुवारी रोजी गाडी पूर्णपणे दुरुस्त करण्यात आली. त्यामुळे गणेशपेठ आगाराकडून गडचिरोली आगाराला गाडी पूर्णपणे दुरुस्त झाल्याचे कळवले. मात्र कळून सुद्धा गडचिरोलीचे चालक गाडी नेण्यासाठी आले नाही.

आज सकाळी 8.15 वाजताच्या सुमारास बुटीबोरी जवळील रिधोरी येथे गाडी ब्रेक डाऊन झाली. त्यामुळे गणेश पेठ आगारात उभी असलेली गडचिरोलीची ही गाडी तेथे पाठवण्यात आली. नंतर ही गाडी आज सकाळी पावणे बारा वाजताच्या सुमारास परत गणेश बस स्थानकावर आली. (Latest Marathi News)

त्यानंतर यांत्रिक कर्मचाऱ्याला गाडीच्या केबिन जवळ चालकाच्या बाजूला फिल्टर सारखी वस्तू आढळली. त्यांनी ती वस्तू पाहिली त्यात वात असल्यासारखे दिसून आला. त्यांनीही बाब गणेश पेठ आगर प्रमुख गौतम शेंडे यांना कळवली. त्यांनी बचत त्या फिल्डरकडे पाहिलं असता त्यात वात दिसून आल्याने त्यांना हा प्रकार संशयास्पद वाटला. त्यांनी लगेच गणेश पेठ स्थानकावर असलेल्या पोलीस चौकीला कळवले.

पोलिसांनी ही बाब नियंत्रण कक्ष गणेश पेठ पोलीस ठाणे आणि वरिष्ठांना कळवले. त्यानंतर लगेच पोलिसांच्या पथक घटनास्थळी दाखल झाले. बाम बॉम्ब सदृश्य वस्तू दिसल्याने पोलिसांनी लगेच बॉम्बशोधक नाशिक पथक, दहशतवाद विरोधी पथक, गुन्हे शाखा पोलीस यांना बोलावले. बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून पाहणी केल्यानंतर पोलिसांनी तुफान सदृश्य वस्तू ताब्यात घेतली. सूराबर्डी बर्डी येथे बॉम्ब निकामी करण्यासाठी घेऊन गेले.

गाडी गडचिरोलीहून आल्याने संशय वाढला

ही गाडी गडचिरोली वरून आल्याने आणि गाडीमध्ये आढळल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. नक्षलवाद्यांकडून हा बॉम्ब ठेवण्यात तर नाही आला ना याबाबत पोलिसांना संशय आहे. मात्र ही गाडी बुटीबोरी रिधोरा येथून गाडी आल्याने आणि त्यानंतरच ही वस्तू दिसल्याने तिथूनच हा बॉम्ब ठेवण्यात तर नाही आला ना याबाबत संशय निर्माण झाला आहे. पोलिसांच्या अधिक चौकशी सुरू असून आपण कुठून आला याबाबत पोलिसांच्या पुढील तपास सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com